शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीचा प्रश्न पुन्हा आयुक्तांकडे, निर्णय घेण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:47 IST

सन १९९९मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर, बालेवाडी व अन्य २१ गावांमधील रस्ते दीड पट रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत फेरअभिप्रायासाठी पुन्हा आयुक्तांकडे पाठविला.

पुणे - सन १९९९मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर, बालेवाडी व अन्य २१ गावांमधील रस्ते दीड पट रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत फेरअभिप्रायासाठी पुन्हा आयुक्तांकडे पाठविला. तब्बल १३ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनीच रस्तारुंदी करणे गरजेचे आहे, यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी लेखी शिफारस करून हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठीवला होता. तेव्हापासून हा प्रस्ताव स्थायी समितीतच रेंगाळला आहे व आता तर पुन्हा आयुक्तांकडे गेला आहे.या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर महापालिकेने त्यांचा विकास आराखडा तयार केला. त्यात एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के जागा रस्त्यांसाठी मोकळी सोडणे आवश्यक असताना फक्त ९ टक्के सोडण्यात आली. सरकारने त्यावर हरकत घेतली. त्यानंतर आयुक्तांनी तत्कालीन स्थायी समितीकडे नियमाप्रमाणे रस्तारुंदी करावी, असा प्रस्ताव दिला. समितीने तो प्रस्ताव या विषयावर खास सभा घ्यावी म्हणून बाजूला ठेवून दिला. १३ वर्षे तो तिथेच आहे. सत्तापरिवर्तन झाले तरीही त्यावर काहीच निर्णय व्हायला तयार नाही.या रस्तारुंदीत अनेक बांधकाम व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी म्हणून रस्तारुंदी करणे टाळले जात आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ते स्थायी समितीकडे फेरविचार प्रस्ताव देत असतात. या मंगळवारी समितीने हा रस्ता रुंदीचा हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरअभिप्रायार्थ म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनीच घेतलेल्या निर्णयावर त्यांना पुन्हा फेरनिर्णय घ्यायला लावण्याचा चुकीचा प्रकार यात झाला असल्याची टीका बागुल यांनी केली. रस्तारुंदीचे महत्त्व ओळखून आता निदान आयुक्तांनी तरी त्वरित निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या