शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Pune News:ATM उघडणाऱ्या चावीने दीड मिनिटात 11 लाख लंपास; मुळशीतील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:11 IST

एटीएममधून कॅश येत निघत नसल्याने या संदर्भात नागरिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

पिरंगुट : नेहमीच गजबजलेला व वर्दळीचे ठिकाण असलेल्या मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून अकरा लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रविण चिमणदास बुटाला यांनी सोमवारी (दि.25) रोजी रात्री उशिरा या घटने बाबत पौड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यातील चौथा शनिवार (दि. 23)आणि रविवार (दि 24) अशा जोडून बँकेला दोन सुट्ट्या आल्यामुळे पैशांअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी चार वाजता अकरा लाख रुपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यात आली होती. माञ सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तीनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून एटीएम च्या आत मध्ये असणारी अकरा लाख रुपयाची रक्कम पिशवीत भरून घेऊन गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सोमवार (दि.२५) रोजी एटीएममधून कॅश येत निघत नसल्याने या संदर्भात नागरिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तरी या घटनेबाबत बँक व्यवस्थापनाच्या वतीने पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सदर घटनेचा तपास पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.