शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

पालिकेच्या शिक्षण विभागाकडुन राज्यसरकारच्या आदेशाला हरताळ

By राजू हिंगे | Updated: March 7, 2025 20:48 IST

२५ हजारापेक्षा कमी वेतन असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून व्यावसायिक उत्पन्न कर कपात

पुणे :पुणे महापालिका शिक्षण विभाग गेल्या दोन वर्षांपासून २५ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन मिळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून व्यावसायिक उत्पन्न कर कपात करत आहे. राज्यसरकारच्या अध्यादेशानुसार हे उत्पन्न करमुक्त असताना महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पुणे महापालिका शिक्षण विभागाने राज्यसरकारच्या अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्याने महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.राज्याचा अर्थसंकल्प २०२३ मध्ये तत्कॉलीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. त्या अर्थसंकल्पात महिलांसाठीही भरघोस मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महिलांना मासिक २५ हजार रुपयांपर्यंतचे व्यावसायिक उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर कर होते. तसेच त्या संबंधीचा शासन आदेश ६ एप्रिल २०२३ ला काढण्यात आला. तरीही पुणे महापालिकेत कंत्राटीपद्धतीने काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियांनातील महिला कर्मचाऱ्यांचा दहा टक्के व्यावसायिक उत्पन्न कर दर मासिक महिना वेतनातून कापला जात आहे.

विशेष म्हणजे पुणे महापालिकेत प्राथमिक शिक्षणंधिकारी सुनंदा वाखारे असून समग्र शिक्षा प्रकल्प अधिकारी मनोरमा आवारे आहेत. तरीही अध्यादेश लागू करण्यास दिरंगाई केली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून २० हजार या मासिक वेतनावर काम करण्याऱ्या महिला शिक्षकांचा दहा टक्के व्यावसायिक उत्पन्न कर दर महिना नियमित कापला जात आहे. राज्यसरकारने महिलांना आता मासिक २५, हजार रुपयांपर्यंतचे व्यवसायिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा मासिक १० हजार रुपये होती, ती २०२३ मध्ये २५ हजार रुपये करण्यात आली. दिव्यांग व्यक्तिची व्यवसायकरातून सुटका करण्यात आली.एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्यायपुणे महापालिकेतील समग्र शिक्षण अभियानात एकूण ६६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात २५ विशेष शिक्षक आहेत. ज्यांचे मसिक वेतन २५ हजारा पेक्षा कमी आहे. त्यात महिला विशेष शिक्षकांची संख्या २१ आहेत. त्यातील तीन महिला विशेष शिक्षक या दिव्यांग आहेत. त्यांचा राज्यसरकारच्या या आदेशानुसार व्यवसाय कर कापला कापला जात नाही. त्यामुळे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी स्थिती आहे.पिंपरी चिचंवड महापालिका तो कर कापत नाहीविशेष म्हणजे पुणे लगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियांनातील महिला कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक उत्पन्न कर याच शासन आदेशानुसार कापला जात नाही.

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे पुणे महापालिकेला बंधनकारक आहे.  या अध्यादेशाची अमलबजावणी का झाली नाही याची माहिती घेण्यात येईल.राज्य सरकारने काढलेल्या अध्यदेशाचे अंमलबजावणी ही तात्काळ केली जाईल.  - पृथ्वीराज बीपी अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिकाराज्य सरकारच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्याना या शासन आदेश महत्वाचे वाटत नाही. त्यामुळे संबधित अधिकार्यावर पुणे महापालिका आयुक्त यांनी कारवाई केली पाहिजे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जो आर्थिक भुर्दंड या महिला कर्मचाऱ्यांना बसला आहे. संबधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा. - विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाWomenमहिला