शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचे रखडलेले पुरस्कार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:19 IST

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा महानगरपालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा महानगरपालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ग्रहण लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर गतवर्षी रखडलेले आणि यंदाच्या १७ पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैैठकीत पालिकेतर्फे घेतला आहे. त्यामुळे आता संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी पुरस्कारांच्या वितरणाचा मार्ग सुकर झाला आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांवर होणारी उधळपट्टी रोखावी, राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेने पुरस्कारांनाच कात्री लावली होती. याबाबत सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापौरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले होते. याबाबत माजी उपमहापौैर आबा बागुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुणे पक्षनेत्यांच्या बैठकीत पुरस्कार वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे शहराला अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे लाभली आहेत. गेल्या ७० वर्षांत त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रांत योगदान देणाºयांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो. राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडल्याने आठ-नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले होते. कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरू करण्याची मागणी केली होती. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे रखडलेले पुरस्कार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.