शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बाणेरमध्ये पुणे महापालिका साकारणार २१२ बेड्चे कोव्हीड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:52 IST

रुग्णालयात १५० ऑक्सिजन आणि ६२ आयसीयू बेड्स

ठळक मुद्देबाणेरमध्ये चार ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचे नियोजन

पुणे: शहरामधील वाढती कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास महापालिका सक्षम असून पहिल्या कोरोना लाटेप्रमाणेच दुसऱ्या कोरोना लाटेवरदेखील नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपाय योजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे महानगरपालिकेने बाणेर येथे २१२ बेड्सचे कोव्हीड रुग्णालय तयार होणार आहे.  यासाठी महापौर निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

बाणेर येथील सर्व्हे क्र. ३३ येथे पुणे महापालिकेच्या आरक्षित जागेत २१२ बेड्सचे कोविड रुग्णालय साकारत असून याचा आढावा महापौर मोहोळ यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांसमवेत घेतला आहे. त्यानंतर ते बोलत होते. या कोविड रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेड्स आणि ६२ आयसीयू बेड्स असणार आहेत. कमीत कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. या पाहणी वेळी आयुक्त विक्रम कुमार, सभागृहनेते गणेशजी बिडकर ,स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, बाबुराव चांदेरे ,प्रल्हाद सायकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले,  दुसऱ्या लाटेच्या काळात स्वाभाविकपणे कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे.  त्यादृष्टीने व्यवस्था व व्यवस्थापन वाढवण्याची जबाबदारी महापालिका कार्यतत्परतेने पार पाडत आहे. पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी बाणेर भागात अद्ययावत कोव्हीड रुग्णालय महापालिकेने सुरू केले होते. एक वर्ष अत्यंत चांगली सुविधा व उपचार या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना देण्यात येत आहेत. महापालिकेचे हे एक मोठे यश असून समाधानाची बाब देखील आहे. त्याच धर्तीवर बाणेरमध्ये सर्व्हे क्र. ३३ येथे आता दुसरे कोविड हॉस्पिटल महापालिका उभारत आहे. बाणेर येथील दुसरे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असून लवकरच अद्ययावत २६२ बेडचे हॉस्पिटल बाणेर भागामध्ये उभारले जाईल. हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक तो सर्व निधी महापालिकेने तरतूद केला असून महापौर निधीतून निधी देण्यात आला आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

बाणेरमध्ये ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारणार

बाणेरमध्ये साकारत असलेल्या दुसऱ्या कोविड रुग्णालयात १ हजार एलपीएम या क्षमतेचे चार ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टॅंकचीही उभारणी केली जात आहे. तसेच वातानुकूलित इमारतीसह सीसीटीव्हीदेखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशीही माहिती मोहोळ यांनी दिली आहे.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMayorमहापौर