शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 23:54 IST

आदेश येत्या 27 एप्रिलपर्यंत लागू राहणार

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्व हद्दी रविवारी मध्यरात्रीपासून सील करण्यात येत असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जरी केले. हे आदेश येत्या 27 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहेत.या आदेशाप्रमाणे केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती, त्यांची कार्यालये व वाहने यांना वगळण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणालाही पुणे महापालिका हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही तसेच बाहेरही जाऊ दिले जाणार नाही.महापालिका तसेच अन्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने 10 टक्के उपस्थितीनुसार आवश्यक पास दिले जाणार आहेत.पोलिस यंत्रणेकडून देण्यात आलेल्या कालावधीतच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने खुली राहणार आहेत. दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाईचे अधिकारही क्षेत्रीय कार्यालय सहआयुक्त यांना देण्यात आले आहेत.पुणे महापालिका हद्दीतील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी 13 क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कोरोना संसर्ग प्रमाण वाढलेले असल्याने या भागात विशेष बाब म्हणून मोठी खबरदारी घेतली जाणार आहे.पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने, पुणेकरांच्या सार्वजनिक आरोग्यच्या दृष्टीने नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणणे आवश्यक बनल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याची मुख्य अंमलबजावणी करण्याचे काम आता पोलीस यंत्रणेबरोबरच पालिका सह आयुक्तांनाही देण्यात आल्याने कर्फ्यु ची काटेकोर अंमलबजावणी होणार हे निश्चित झाले आहे. परिणामी नागरिकांनी घराबाहेर न पडणे हे क्रमप्राप्तच झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका