शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

"पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विकासकामात झालेल्या दुरावस्थेची दुचाकीवरून पाहणी करावी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 17:13 IST

महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन, मनपाच्या अनेक विकास कामांना विलंब

ठळक मुद्देखोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांचा प्रचंड मनस्ताप

पुणे: पुणे शहरात सर्वत्र खोदाईची कामे चालू आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट, लॉकडाउन, अवकाळी पाऊस व कामगारांची वाणवा या परिस्थितीत मनपाच्या अनेक विकास कामांना विलंब झाला हे मान्य केले. तरी या कामात अनेक प्रशासकीय चुका देखील निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी एकदा शहराची दुचाकरीवरून पाहणी करावी. आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. खोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी महावितरण, बी एस एन एल तर कुठे पाण्याच्या लाईन तोडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अज्ञात कारणामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप ही ह्या वाहिन्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाच्या प्रति प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे. अनेक रस्ते केबल कंपनी, महावितरण, एल अँड टी यांनी खणून अनेक दिवस झाले. मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. त्याची कालमर्यादा काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

सर्वप्रथम आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी दुचाकी वरून शहरभर फेरी मारावी व खोदाईच्या कामाची व रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करावी म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना येईल. तसेच शहरातील एकूणच खोदाईच्या कामाचे ऑडिट करावे. याद्वारे एकूण खोदाईला दिलेल्या परवानग्या, प्रत्यक्षात झालेली खोदाई व नियमांचे पालन झाले का हे ही प्रशासनाच्या लक्षात येईल. अशा काही मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याroad safetyरस्ते सुरक्षा