शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:12 IST

सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत.

ठळक मुद्देठेकापध्दतीने वाहनचालक घेण्यासाठी  १५ कोटीचा खर्च

पुणे : महापालिकेच्या विविध मालमत्तांची देखभाल व इतर कामांमध्ये मदत करण्यासाठी १ हजार ३५० बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २२ कोटी ७ लाख २१ हजार रुपयांना हे काम देण्यात आले आहे.      सुरक्षा विभाग विविध प्रभाग कार्यालये, उद्याने, स्मशानभूमी, रुग्णालये, जलतरण तलाव, सांस्कृतिक केंद्रे, सामाजिक मंदिरे, प्राणी संग्रहालये, मनपाने व्यापलेल्या मालमत्ता, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या टाक्यांसाठी जबाबदार आहेत. या सर्व ठिकाणी, सुरक्षा ही पालिकेच्या सुरक्षा विभागाची जबाबदारी आहे. पालिकेच्या या सर्व विभागांमध्ये ६६६ सुरक्षारक्षकांची आवश्यकता असते. सद्यस्थितीत स्थायी स्वरूपात कर्मचार्-यांची संख्या ३९४ आहे.  त्यापैकी २४९ पदे रिक्त आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. त्यात सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि यांची निविदा सर्वात कमी दराची आली. त्यांच्याकडुन प्रति महा १३ हजार ६२४ या दराप्रमाणे १हजार ३५० कामगार पुरविण्यात येणार आहे. १२ महिन्यासाठी हा करार असणार आहे. राज्यसरकारकडुन किमान वेतन दर आणि विशेष भत्यामध्ये वेळोवेळी होणारया वाढीसह संबंधीताना बिले देण्यात येणार आहेत.-----------------------ठेकापध्दतीने वाहनचालक घेण्यासाठी  १५ कोटीचा खर्चमहापालिकेतील कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पध्दतीने वाहनचालक सेवक पुरविणे या कामासाठी प्रशासनाने निविदा मागविली होती. त्यात श्री एंटरप्रायजेस यांची सर्वात कमी दराची  म्हणजे  १४ कोटी ९५ लाख ३३ हजार ९३०रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. राज्यसरकारकडुन किमान वेतन दर आणि विशेष भत्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाढीसह संबंधीताना बिले देण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका