शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्याला रक्त भरून ‘ती’ देतेय मुलाला नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:54 IST

पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले.

तळेगाव ढमढेरे : पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. मोलमजुरीतून १२० रूपये मिळतात, त्यात घरात चूल पेटवायची की मुलाला नवसंजीवनी देण्यासाठी उपचारासाठी खर्च करायचे... ‘ती’ची ही धडपड विठ्ठलवाडी येथे कार्यक्रमाच्यानिमित्ताने समोर आली आणि पाच मिनिटांत १० हजार रुपये जमा झाले... मात्र तिचे प्रश्न तसेच कायम आहेत.शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे नीता सचित लोंढे ही युवती नवरा सांभाळत नसल्याने वडील रावसाहेब म्हस्के यांच्याकडेच राहत आहे. गवत कापण्याचे मोलमजुरीचे काम करून दोन मुलांना शिक्षण देत सांभाळ करीत आहे. सम्यक लोंढे इयत्ता चौथीमध्ये व दुसरा आर्यन लोंढे इयत्ता तिसरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.आर्यन दीड वर्षाचा असताना त्यास थॅलेसेमिया हा दुर्धर आजार समोर आला. वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंधरवड्यात भरले जाणारे रक्त येथे विनामूल्य मिळू लागल्याने तिला मोठा आधार मिळाला, मात्र दर महिन्याला लागणाºया गोळ्या, औषधांसाठी ४ हजार रुपये खर्च ही माता मोलमजुरीच्या पैशातून आजपर्यंत भागवत आली आहे. या आजाराशी सामना करताना हे कुटुंब अक्षरश: हवालदिल झाले आहे.आतापर्यंतचा खर्च तीने कसाबसा केला पण पुढील उपचाराचा प्रश्न उभा राहिला आहे. विठ्ठलवाडी येथे कार्यक्रमात तिची कहानी ऐकूण अवघ्या पाच मिनिटांत दहा हजार रुपयांची मदत ग्रामस्थांनी दिली. पण पुढे काय? हा प्रश्न तिच्यासमोर आहेच.मी दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा खर्च कसाबसा भागवतेय. शस्त्रक्रियेसाठी येणारा दोन ते तीन लाख रुपये एवढा मोठा खर्च उभा करू शकत नाही. जर लोकवर्गणीतून पैसे उभे राहिल्यास माझ्या मुलाला नवसंजीवनी मिळेल.- नीता लोंढे, माता

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या