शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामधारक रडारवर; पीएमआरडीएतर्फे दोन गुन्हे दाखल

By नारायण बडगुजर | Updated: November 30, 2024 12:17 IST

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा बांधकामांना नोटीस देऊन गुन्हे ...

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा बांधकामांना नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यात मावळ तालुक्यातील दोन बांधकामधारकांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे.

पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २९) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इंदाराम चौधरी आणि दीपक कुमार सहानी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रस्ता नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ चे पोट कलम २ प्रमाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांनी गहुंजे येथे गट क्रमांक १९८ मध्ये अनधिकृत बांधकाम सुरू केले. इंदाराम चौधरी याने ३० बाय ८० फुटामध्ये चार मजली ९६०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम केले. तसेच दीपक सहानी याने बांधकाम चालू ठेवून त्यामध्ये २० बाय ४० फूट असे एकूण ५६०० चौरस फूट चार मजली अनधिकृत बांधकाम केले. हा प्रकार फेब्रुवारी २०२४ मध्ये पीएमआरडीए प्रशासनाच्या निदर्शनास आला. त्यानंतर पीएमआरडीएतर्फे इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांना नोटीस देण्यात आली.महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रस्ता नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ चे पोट कलम २ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. मात्र, नोटीसचे अनुपालन न करता इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांनी बांधकाम चालू ठेवले. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनातर्फे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाArrestअटकPoliceपोलिस