शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोला वादाचे ग्रहण

By admin | Updated: April 30, 2015 23:55 IST

गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे.

पुणे : गेल्या चार वर्षांपासून केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या मान्यतांच्या फेऱ्यामध्ये अडकलेली पुणे मेट्रो आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यात वादाच्या ग्रहणात सापडली आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर तत्काळ पुणे मेट्रोचे मार्गी लावण्याचे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने दिलेले आश्वासन आघाडी सरकारप्रमाणेच राजकीय इच्छाशक्तीअभावी पुन्हा रखडला आहे. तर या वादामुळे नोव्हेंबर २०१४ पासून एप्रिल २०१५ अखेरपर्यंत या प्रकल्पाची किंमत दररोज दोन कोटी रुपयांनी वाढत असून, तो जवळपास ४०० कोटींनी वाढला आहे. २०१४ च्या सुरुवातीलाच केंद्रात आणि राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने भाजपकडून सत्तेत आल्यास पुणे मेट्रो मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, सत्ताबदल होताच या प्रकल्पाला वादाचे ग्रहण लागले. (प्रतिनिधी)या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र, ही बैठक होण्यास मार्च २०१५ उजाडला. या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमली. या समितीचा अहवाल एका महिन्यात शासनाकडे सादरही करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही निर्णय होत नसल्याने मेट्रोचा खर्च दिवसाला दोन कोटींनी वाढतच आहे. ४महापालिकेने २००९ मध्ये शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (डीएमआरसी) सोपविले. डीएमआरसीने २०११ मध्ये हा आराखडा तयार महापालिकेस सादर केला. ४नंतर तो राज्यशासनाकडून केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यानंतर २०१२ च्या महापालिका निवडणुका होईपर्यंत त्याबाबत केंद्राकडून कोणतीही हालचाल झाली नाही. ४त्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी त्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर पुन्हा दोन वर्षे २०१४ पर्यंत केंद्राकडून कागदपत्रांच्या पूर्ततांच्या मागणीव्यतिरिक्त काहीच हालचाली झाल्या नाहीत.