शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची होऊ शकते पाण्यातील मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:24 IST

शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही

पुणे : शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही, अशी टीका नगरसेवकांकडून होत आहे. महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहराचा पावसाळी गटारांचा आराखडा तयार करण्याचीघोषणा केली होती; मात्र त्यादृष्टीने प्रत्यक्षात अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.मध्य पुण्यात साधारण साडेचारशे किलोमीटर अंतराची गटारे आहेत. ती सर्व जुनी झाली आहेत. त्यांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने कधी लक्षच दिलेले नाही. नगरसेवकांकडूनही प्रभाग विकास निधीमध्ये गटारीची कामे केली जातात. मात्र ही कामे, आहे तेच गटार उखडणे व आहे तसेच पुन्हा बांधणे या प्रकारची असतात. पाऊस जास्त पडला तर तिथे थेट घरांमध्ये पाणी शिरण्याचे अनेक प्रकार मागील वर्षी झाले आहेत. काँक्रिटच्या रस्त्यांवरची गटारे रस्त्याला समतल अशी केली आहेत. मात्र त्यावरच्या जाळ्यांमधून त्यात कचरा जाऊन ती तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत.नगरसेवक दीपक मानकर यांनी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देत ही सर्व स्थिती कळवली असून, गटारीसंबंधी त्वरित धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.