पुणे : येत्या ११ ते १३ डिसेंबर दरम्यान पुणे इंटरनॅशनल लिटटरी फेस्टिव्हलचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. कोरोनामुळे ऑनलाइन होणाऱ्या या महोत्सवात साहित्य विषयक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवता येणार आहे. देश-परदेशातील लेखक, विचारवंत आणि कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
दरवर्षी यशदा येथे होणारा पुणे इंटरनॅशनल लिटटरी फेस्टिव्हल ११ ते १३ डिसेंबर दरम्यान फेसबुक, यूट्यूब आणि ६६६.स्र्र’ा.्रल्ल या वेबसाइटवर होणार असल्याची माहिती महोत्सवाच्या संचालक डॉ. मंजिरी प्रभू यांनी दिली.
‘समाजमाध्यमांची शक्ती’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय असून, शंभरपेक्षा जास्त वक्ते पन्नास पेक्षा जास्त सत्रांमधून सहभागी होणार आहेत. यंदाच्या महोत्सवात डॉ. शशी थरूर, मेघनाद देसाई, लुइस बँक, विकास स्वरूप, प्रदीप भंडारी, डॉ. अलका पांडे, भावना सोमय्या, केतन आनंद, राजेश तलवार, विक्रम सूद, अनिर्बन भट्टाचार्य, तुहीन सिन्हा, मीरा बोरवणकर, शंतनू दत्ता, कार्तिक व्ही. के., नितीन गोखले, सुहास पळशीकर, सम्राट फडणीस, डॉ. जेन गुडॉल, मार्टिन एडवर्ड, जेनिफर क्रॉफ्ट, स्कॉट आयमॅन, डॅनियल हॉन, सारा वॉर्ड, रिचर्ड फायत, डॉ. पिटर अल्टमॅन, डेनिस सिल्व्ही, गॅहम सीड, फ्रँकोस बॉन, एरीक बॅरमॅक, अॅना फिलोमेना, अँलन रॉड, लिओन हॉर्ड थॉमा या लेखक व पत्रकारांचा समावेश आहे.
मराठी वाचक काय वाचतात, या विशेष सत्रात मनोहर सोनावणे, दीपक करंदीकर, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, गणेश महादेव आणि विश्वास देशपांडे हे सहभागी होणार आहेत. नवोदित लेखकांसाठी खास सत्र तसेच लेखन कार्यशाळा होणार आहे.
-----------------------------------------------