शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - गरमागरम उपम्यात लपवले 1 कोटी 29 लाख रुपये, प्रवाशांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:06 IST

परदेशी चलनाची तस्करी करणा-या दोन प्रवाशांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली आहे

ठळक मुद्देपरदेशी चलनाची तस्करी करणा-या दोन प्रवाशांना पुणे विमानतळावर अटकदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली दोघा प्रवाशांकडून एकूण एक कोटी 29 लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे

पुणे, दि. 8 - परदेशी चलनाची तस्करी करणा-या दोन प्रवाशांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. हे दोघे प्रवासी दुबईला जात असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे गरमागरम उपम्यात हे परदेशी चलन लपवून नेण्यात येत होतं. या दोघा प्रवाशांकडून एकूण एक कोटी 29 लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे. 

रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली अशी माहिती विमानतळ सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. इमिग्रेशन अधिका-याला निशांत अशी ओळख पटलेल्या प्रवाशाची कागदपत्रं पाहून संशय आला होता. संशय आल्यानंतर अधिका-याने तात्काळ कस्टम अधिका-यांशी संपर्क साधला. यानंतर कस्टम अधिका-यांनी पुन्हा एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्याचा आदेश दिला. सर्व सामानाची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. 

'सामानाची तपासणी केली असता बॅगेत उपमा असल्याचं आढळलं. मात्र उपमा ठेवलेल्या पिशवीचं वजन पाहता अधिका-यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी पिशवी पुर्ण उघडून पाहिली असता त्याच्यात 86 हजाराचे अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. 

काही वेळानंतर इमिग्रेशन अधिका-यांनी कस्टम अधिका-यांशी संवाद साधत अजून एका प्रवाशावर संशय असल्याचं सांगितलं. एच रंगलानी असं या महिला प्रवाशाचं नाव होतं. त्यादेखील त्याच विमानाने दुबईला जाणार होत्या. सीआयएसएफ सुरक्षा जवानांनी सामानाची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेतही उपमा असल्याचं आढळलं. तपासणी केली असता उपम्यात  86,200 अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले. 

या दोन्ही प्रवाशांचा आणि घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याची तपासणी कस्टम अधिकारी सध्या करत आहेत.