शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

पुण्याचा कचरा आदिवासींच्या मुळावर

By admin | Updated: February 14, 2015 22:51 IST

येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली.

गोहे बुद्रूकची उभेवाडी उंच डोंगरावर वसलेली छोटीशी वस्ती आहे़ पुण्यापासून १०० किलोमीटर अंतर आहे़ या ठिकाणी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास सलग २५ ते ३० गाडया आल्या़ येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता प्लास्टिक व खाणीने भरलेले ढिग त्यांना दिसले़ ग्रामस्थांनी चौकशी केली असता, शेतीसाठी खत म्हणून महानगरपालिका कचरा देते. गोहे येथे रहाणाऱ्या व पुणे महानगरपालिकेत कामाला असणाऱ्या मोघाजी उभे यांनी खतासाठी हा कचरा टाकायला लावला आहे़ त्यांनी दाखविलेल्या जागेनुसार पुणे महानगरपालिकेच्या गाडयांनी येथे कचरा खाली केला़ मोघाजी उभे महानगरपलिकेत सॅनेटरी इन्स्पेक्टर असून दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेची गाडी येऊन पहाणी करून गेली होती, असे ग्रामस्थ सिताराम जोशी, रामचंद्र गेंगजे, वामन जोशी, इंदुबाई गेंगजे, किसन गेंगजे, सितराम गेंगजे, रमेश गेंगजे, दत्तात्रय गेंगजे यांनी सांगितले़ग्रामपंचायतची परवानगी न घेता कोणालाही न विचारता हा कचरा पुणे महानगरपालिकेने टाकला आहे़ हा कचरा पुणे महानगरपालिकेने घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगर पालिकेवर मोर्चा आणतील, हा कचरा महानगरपालिके बाहेर आणून टाकला जाईल, तसेच पुन्हा गाडया येऊ नयेत यासाठी येथे पोहचणाऱ्या रस्त्याला रात्री दगडी लावून ठेवल्या जातील व एक गाडी देखील जाग्यावर येऊ देणार नसल्याचे उपसभापती सुभाष तळपे यांनी सांगितले़ ४या कचऱ्यातून खत कसे होऊ शकते हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन दाखवावे़ हे प्लास्टिक जनावऱ्यांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतील़ हा कचरा रानात पसरले, प्लास्टिकमुळे झाडे उगवणार नाहीत, पर्यावरणाचा ऱ्हास होईल़ ४शहरीकरणामध्ये आमच्या आदिवासींचा बळी घेऊ नका, काबड कष्ट करून आदिवासी शेतकरी जगतात, मानव निमित्त आपत्ती आमच्यावर नको, खाजगी जागेत जरी कोणी कचरा टाकत असले तरी आम्ही कचरा टाकू देणार नाही़ ४ पुन्हा महानगरपालिकेची माणसे व गाडया येथे आल्या तर त्यांनी परत नीट जाऊ देणार नाही, असे सिताराम जोशी यांनी सांगितले़ गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.४पुणे महानगरपालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महानगरपालिकेने त्वरीत घेऊन जावा व यापुढे महानगरपालिकेंनी आदिवासी पट्टयात कुठेही कचरा टाके नये अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.४आज गुपचूप २५ गाडया कचरा आणून टाकल्या उद्या महापालिका १00 गाडया कचरा आणून टाकू शकते, ग्रामस्थ स्वच्छ बसणार नाहीत. पुण्याचा कचरा आम्हाला नको, पुणे महापालिकेने कचऱ्याचा प्रश्न स्वतंत्रपणे सोडवावा, त्यांच्या आम्हाला देणेघेणे नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.या घटनेबाबत पुणे महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून कचरा उचलण्यास सांगितले आहे. हा कचरा उद्या उचलण्यात येणार आहे. गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या कृतीमुळे ग्रामस्थांमध्येही संताप पसरला आहे़ पुणे महापालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महापालिकेने त्वरित घेऊन जावा व यापुढे महापालिकेने आदिवासी पट्ट्यात कुठेही कचरा टाकल्यास आंदोलन करण्यात येईल.- दिलीप वळसे-पाटील,आमदार, आंबेगाव तालुका. शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ओला कचरा टाकला आहे. ओल्या कचऱ्याऐवजी प्लॅस्टिकयुक्त कचरा टाकला असेल, तर तो परत उचलण्यात येईल, असे ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे.- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, कचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका