शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

By admin | Updated: December 31, 2014 23:13 IST

दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.

राहुल कलाल - पुणेदशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत पुण्यातील एड्सग्रस्तांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे. विविध क्षेत्रांत वेगाने घोडदौड करणाऱ्या पुण्यात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही खूप होते. २०१३ मध्ये २ हजार २७१ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण कमी करण्यासाठी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे २०१४ या वर्षात हे प्रमाण झपाट्याने घटून १ हजार ५५८ रुग्णांपर्यंत खाली आहे. एकदा झाला की कधीही बरा न होणारा आजार अशा या भयानक आजाराबाबत मोठया प्रमाणात जनजागृती झाल्याने ही संख्या घटत असल्याचे चित्र आहे. हे सकारात्मक चित्र तयार करण्यामध्ये सरकारी स्तरावरील योजनांसह स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग आहे.सन २०१३ मध्ये महिन्याकाठी साधारणत: अडीचशे ते तीनशे रुग्ण शहरात सापडत होते. मात्र, २०१४ मध्ये हे प्रमाण घटून दोनशेच्या घरांमध्ये आले.चांगल्या उपचारामुळे वयोमानही वाढलेएचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता वेगाने घटून अवघ्या काही वर्षात संबंधित व्यक्तीचा मृत्यू होत होता. एचआयव्ही पूर्णपणे बरा होणारे औषध अजूनही विकसित करण्यात न आल्याने एचआयव्हीने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दशकापूर्वी खूप मोठे होते. मात्र विविध संशोधनांमधून एचआयव्हीचे विषाणू रोखणारे आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करणाऱ्या औषधांचा वापर उपचारामध्ये वाढला. या औषधांमुळे एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांचे वयोमान वाढले आहे.