शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे फेस्टिव्हल : पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्याचा मिलाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:30 IST

महिलांची नृत्य स्पर्धा, संतूर वादक मदन ओक आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी सादर केलेला ‘संतूर धून मंतरलेली’ कार्यक्रम, शास्त्रीय वाद्यांचा मिलाफ अशा विविध माध्यमांतून पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा मिलाफ रसिकांना अनुभवायला मिळाला.

पुणे  - महिलांची नृत्य स्पर्धा, संतूर वादक मदन ओक आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी सादर केलेला ‘संतूर धून मंतरलेली’ कार्यक्रम, शास्त्रीय वाद्यांचा मिलाफ अशा विविध माध्यमांतून पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा मिलाफ रसिकांना अनुभवायला मिळाला.महिला महोत्सवाअंतर्गत झालेल्या महिलांच्या नृत्य स्पर्धेमध्ये २० ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० अशा वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या. संयोगिता कुदळे व दीपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले होते. दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, सुप्रिया ताम्हाणे, अभय शास्त्री, मीरा पाथरकर, सुचित्रा दाते, संयोगिता कुदळे आणि दीपाली पांढरे आदी उपस्थित होते.प्रख्यात कलावंत पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असणारे ज्येष्ठ संतूरवादक पंडित मदन ओक यांनी संतूरवादनातून प्रेक्षकांची मने जिंकली. पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर केलेली साथ अतिशय कसदार ठरली. महापौर मुक्ता टिळक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. गणेशोत्सवात शास्त्रीय वाद्ये आणि त्यावर उपशास्त्रीय आणि शास्त्रीय रचनांची पर्वणी पुणेकरांनी अनुभवली. पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ हा कार्यक्रम हशा आणि टाळ्यांनी बहरला. ‘हसायदान फाउंडेशन’ने आयोजन केले होते. ज्येष्ठ एकपात्री कलावंत बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैताली माजगावकर-भंडारी, श्रीप्रकाश सप्रे, धनंजय जोशी हे सहभागी झाले होते.निकाल पुढीलप्रमाणे -२० ते ३५ वर्षे वयोगट (सोलो)प्रथम क्रमांक -करिश्मा कोठारेद्वितीय क्रमांक -पूजा अस्मिनकरतृतीय क्रमांक -शुभांगी फंड३६ ते ५० वर्षे वयोगट (सोलो)प्रथम क्रमांक - कात्याद्वितीय क्रमांक -गौरी गोखलेतृतीय क्रमांक -पूनम शिंदे२० ते ५० वर्षे वयोगट (ग्रुप)प्रथम क्रमांक -शिल्पाज वंडर फीट ग्रुपद्वितीय क्रमांक -नुपूर डान्स अ‍ॅकॅडमीतृतीय क्रमांक -वज्र ग्रुप

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Puneपुणे