शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे फेस्टिव्हल : २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रंगणार सोहळा, संगीत, नृत्य व गायनाची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:02 IST

गेल्या २९ वर्षांपासून पुण्याच्या संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या येत्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

पुणे : गेल्या २९ वर्षांपासून पुण्याच्या संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या येत्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार यंदा अभिनेते शेखर सुमन, क्रिकेटपटू केदार जाधव, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आयटीतज्ज्ञ आनंद खांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अभिनेता विवेक ओबेरॉय, रति अग्निहोत्री, कार्तिक आर्यन, नेहा शर्मा आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई आदी या वेळी उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात नृत्य, संगीत, नाट्य आणि क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये आॅल इंडिया उर्दू मुशायरा, उगवते तारे, इंद्रधनू, शास्त्रीय संगीत, नृत्य, सुगम संगीत, मराठी कविसंमेलन, हास्योत्सव, एकपात्री, महिला महोत्सव, पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, मराठी नाटके अशा विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेण्यात येणार आहे. गणेश कला, क्रीडा रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय फेस्टिव्हलमध्ये गोल्फ, मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती या खेळांच्या स्पर्धाही रंगणार आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.ऊर्मिला मातोंडकरची लावणी ठरणार आकर्षणपुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर लावणी सादर करणार आहे. ऊर्मिलासह पूजा सावंत, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी, वैशाली जाधव, वैष्णवी पाटील या अभिनेत्री लावणीवर थिरकणार आहेत. या वेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राधा सागर आणि नकुल घाणेकर गणेशवंदना सादर करणार असून त्यानंतर भार्गवी चिरमुले, नंदेश उमप आणि अभ्यंग कुवळेकर यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण रंगणार आहे.