शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : समान पाणीपुरवठा; एकच निविदा, मुदतवाढीनंतरही ठेकेदार अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:54 IST

महापालिकेची बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली.

पुणे : महापालिकेची बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. पंरतु वारंवार मुदतवाढ देऊनदेखील या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी ठेकेदार अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर सोमवारी निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु अखेरच्या दिवशी पुन्हा एकाच ठेकेदाराने १ ते ५ झोनच्या कामांसाठी निविदा दाखल केली आहे.महापालिकेकडून शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील सतराशे किमीची जलवाहिनी टाकणे, पाणी मीटर बसविणे, जलशुद्धीकरण केंद्राची कामे, तसेच योजनेची देखभालदुरुस्ती अशा विविध कामांचा समावेश आहे.ही मुदतवाढ सोमवारी संपुष्टात आली. त्यात केवळ विश्वराज या एकाच ठेकेदार कंपनीने एक ते पाच झोनसाठी एक निविदा भरली आहे. दरम्यान, निविदांना मिळालेल्या या थंड प्रतिसादामुळे समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रियेला पालिका प्रशासन पुन्हा मुदतवाढ देते का, हे पाहावे लागेल.या कामांसाठी प्रशासनाने शहराचे एकूण सहा झोन (विभाग) केले आहेत. त्यानुसार प्रशासनाने या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी याआधी पाच जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत झोन एक व चारसाठी एकही निविदा दाखल झाली नव्हती.तसेच झोन सहासाठी सात कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या, तर उर्वरित झोन क्र. १, ३ आणि ५ साठी प्रत्येकी तीन निविदाच आल्या होत्या. एवढ्या मोठ्या योजनेसाठीच्या कामांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने झोन सहा वगळता अन्य सर्व झोनच्या कामांच्या निविदांना १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwater transportजलवाहतूक