शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी ‘कुशल’तेत पुणे विभागाची आघाडी; तंत्रनिकेतनचे थेट कंपन्यांमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:25 IST

उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रामध्ये दोन महिने कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे बंधनकारकचालु शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून यामध्ये पुणे विभागाची यामध्ये आघाडीया प्रशिक्षणामुळे कंपन्यांना आवश्यक ‘कुशल’ मनुष्यबळ मिळण्यास मदत; तंत्रनिकेतनची मागणीही वाढणार

पुणे : उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी ‘कुशल’ होवू लागले असून उद्योग क्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असून प्रत्यक्ष खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्यास सुरूवात झाली आहे.तंत्र शिक्षणची पदवी, पदविका मिळवूनही योग्य प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीला सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जावून काम करण्याचा अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे तेथील कामाची संस्कृती, स्वरूप अशा विविध बाबींपासून हे विद्यार्थी कोसो दूर होते. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने एक पाऊल पुढे टाकत सुधारीत अभ्यासक्रमातच या गोष्टींचा समावेश केला आहे. त्यानुसार तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रामध्ये दोन महिने कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मंडळाने इंडस्ट्री असोसिएशनसोबत करारही केला आहे. विशेष म्हणजे या कामाचे मुल्यांकन करून त्याचे गुणही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. चालु शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून यामध्ये पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी सुट्टीमध्ये सुमारे ३२०० विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेतले. हा सोलापूर पॅटर्न आता संपूर्ण  पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही राबविला जाणार आहे. त्यानुसार सध्या पाचव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १ ते १३ डिसेंबर या कालावधीत कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थी व खासगी कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ पुणे विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व उद्योगांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

राज्यात सुरूवातीला केवळ पुणे विभागात अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात होणार्‍या या प्रशिक्षणासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणामुळे कंपन्यांना आवश्यक ‘कुशल’ मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील दोन-तीन वर्षांत तंत्रनिकेतनची मागणीही वाढणार आहे.- एम. आर. चितलांगे, उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, पुणे विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे