शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा धरणसाठा अधिक; खडकवासला धरणातून ४२८ क्यूसेक विसर्ग

By श्रीकिशन काळे | Updated: July 29, 2023 15:24 IST

आज ३ वाजता ४२८ क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे...

पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये चांगला पाऊस बरसला आहे. त्यामुळे धरणसाठा ७४.१७ टक्के झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा अधिक आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज ३ वाजता ४२८ क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे.

यंदा पावसाने ओढ दिली होती. जूनमध्ये उशीरा मॉन्सून आला. तो देखील चांगला बरसला नाही. परंतु, जुलै महिन्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणसाठा गेल्यावर्षी पेक्षा यंदा १ टक्का अधिक आहे. गेल्या वर्षी २१.४६ टीएमसी साठा होता. म्हणजे ७३.६३ टक्के. यंदा ७४.१७ टक्के पाणीसाठा (२१.६२ टीएमसी) झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. त्याने पुण्यात पुराची स्थितीही निर्माण झाली होती. यंदा तसे काही झाले तर त्यासाठी पुणे महापालिका सज्ज झालेली आहे. तूर्त शनिवारपासून पुणे शहरातील पाऊस ओसणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.धरणसाठा (टीएमसी) खडकवासला : १.९४ (९८.४१ टक्के)पानशेत : ८.४५ (७९.३४ टक्के)टेमघर : २.०० (५४.०६ टक्के)वरसगाव : ९.२२ (७१.९५ टक्के)

एकूण २१.६२ टीएमसी (७४.१७ टक्के)गतवर्षी २१.४६ टीएमसी (७३.६३ टक्के) 

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड