शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: ‘ड्राय डे’साठी उसळली गर्दी ,अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:45 IST

‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’असलेला ‘खंबा’ खरेदी करण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दुकानांच्या परिसरात सोमवारी रात्री १० नंतर चक्क वाहतूककोंडी झाली.

पुणे : ‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’असलेला ‘खंबा’ खरेदी करण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दुकानांच्या परिसरात सोमवारी रात्री १० नंतर चक्क वाहतूककोंडी झाली. ५०० मीटर अंतर मर्यादेमुळे शहरात असलेल्या मोजक्या दुकानांपैकी काही दुकानांबाहेर येऊन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यामुळे लांबच लांब रांगा दुकानांच्या परिसरात लागल्या.नृत्य करण्यापूर्वी ‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’ आवश्यक असतो. या द्रवपदार्थाला ‘औषध’ असेही उपनाव आहे. त्याची विक्रय करणारी दुकाने नंतर चतुर्दशीनिमित्त बंद राहणार आहेत. मंगळवारी ‘ड्राय डे’ आहे. त्यामुळे रात्री नऊनंतर ‘खंबा’ खरेदीसाठी वेगवेगळ्या वाहनांमधून ‘रसिक’ शहराच्या मध्यवस्तीमधील दुकानांकडे येऊ लागले. दुकाने बंद होण्याची वेळ रात्री ११ असते. ती वेळ जवळ येऊ लागताच त्या त्या भागात वर्दळ वाढली. काही ठिकाणी रांगेत थांबण्याची सक्ती केली जात असल्याने रांग वाढतच गेली.पश्चिम पुण्याकडील एका रस्त्यावरच्या दुकानात रात्री १०च्या सुमारास गर्दी एव्हढी वाढली आणि गोंधळ होऊ लागला की, दुकानदाराने वैतागून शटर बंद केले. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला. त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांचे अस्तित्व दिसताच गोंधळ कमी होऊन मंडळी रांगेत थांबली.बॉक्स हातात येताच आनंदून वेगाने आपापल्या ठिकाणी रवाना होणाºया मंडळींमुळे पुणेकरांना विस्मय वाटला. ‘उद्याची तयारी वाटतं’असं स्वगत पुटपुटून ते वाहतूककोंडीतून मार्गस्थ झाले.

टॅग्स :Puneपुणे