शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीने अश्लील व्हिडीओ काढून केले प्राचार्यांना ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 03:47 IST

महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे.

पुणे - महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे.संबंधित विद्यार्थिनीला तिच्या साथीदारासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथील एका कॉलेजमध्ये सापळा रचून अटक केली आहे. फिर्यादी प्राचार्य व आरोपी विद्यार्थिनी व तिचा मित्र यांची नावे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र, या दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगावमधील एका कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत तर आरोपी मुलगी ही त्या कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीने महत्त्वाचे काम असल्याचे सांगत फिर्यादी यांना १ जूनला घरी बोलावले. त्या वेळी तिने मित्राशी संगनमत करून प्राचार्यांना घरात कोंडून मारहाण व शिवीगाळ केली व त्यांना कपडे काढायला भाग पाडले. त्यानंतर विद्यार्थिनीने स्वत:सोबत मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ काढून घेतला.कॉलेजमध्ये सापळा रचून विद्यार्थिनीसह दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, खंडणीपोटी घेतलेल्या ९ लाख रुपयांपैकी या दोघांकडून ६ लाख २० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.९ लाख रुपये दिले आरोपीलासंबंधित व्हिडीओ मित्र आणि नातेवाइकांना पाठवून सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरून गेल्याने फिर्यादी यांनी ३०पैकी ९ लाख रुपये आरोपीला दिले. मात्र उर्वरित २१ लाख रुपये द्यावे म्हणून आरोपी फिर्यादी यांना मारण्याची व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. त्यामुळे प्राचार्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी विद्यार्थिनी व तिचा मित्र शुक्रवारी कॉलेजला येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या