शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: राज्यमंत्र्यांकडूनच कोरोना नियम पायदळी; दत्तात्रय भरणेंची विनामास्क मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 22:30 IST

पिंपरी बुद्रुक येथे कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून दत्तात्रय भरणेंनी केली विनामास्क सवारी

बारामती: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे सण उत्सवात, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार सांगूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी कोरोना नियम पायदळी तुडवल्याने समोर आले आहे. पिंपरी बुद्रुक येथे भरणे यांनी विनामास्क कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून सवारी केली. विशेष म्हणजे यावेळी एकाही कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे आता अजितदादा यांना तुम्हीच आवरा असे साकडे घालण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.सध्या सण उत्सवांचा काळ सुरु आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, अशा परिस्थितही काही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. विशेष करून राजकीय कार्यक्रम, लग्नसमारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग क्वचितच पहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रीवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यावेळीही कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावरून नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात होता. तर जुन्नरमध्ये लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.

विविध विकासमांचे भूमिपूजन व जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटनासाठी राज्यमंत्री भरणे पिंपरी बुद्रुक येथे आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क भरणेंना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. महत्त्वाचे म्हणजे राज्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांनीकडे मास्क नव्हता. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला होता. लासुर्णे येथील कार्यक्रमालाही राज्यमंत्री भरणे उपस्थित होते. तेथेही अशीच विनामास्कची गर्दी झाली होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना पायदळी तुडवण्याचे काम राष्ट्रवादीतीलच काही नेतेमंडळींकडून होत आहे. नियम केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का असा सवाल इंदापूरकर उपस्थित करू लागले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार