शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Pune Corona News: सकारात्मक चित्र! पुणे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच सक्रिय रुग्णसंख्येतही घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 20:56 IST

१८ एप्रिल होते ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण, तर आज ही संख्या ३३ हजार ७३२ वर

ठळक मुद्देमागील २२ दिवसात तब्बल २२ हजार ९०४ सक्रिय रुग्ण झाले कमी

पुणे: शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम जाणवू लागला असून दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णासंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याच्या परिणामस्वरूप सक्रिय रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. शहरात १८ एप्रिल रोजी ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण होते. तर, रविवारी ही संख्या ३३ हजार ७३२ वर आली. मागील २२ दिवसात तब्बल २२ हजार ९०४ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. 

शहरातील दुसऱ्या लाटेला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शहरात कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात बेड मिळणेही अवघड झाले होते. राज्य शासनाने कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू केली होती. पुणे महापालिकेच्या हद्दीतही १५ एप्रिलपासून संचारबंदीला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवांना परवानगी दिलेल्या वेळांव्यतिरिक्त अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांचे बाहेर पडणे बंद झाले. या काळात मोठ्या प्रमाणावर स्वाब तपासण्याही करण्यात येत होत्या. साधारणपणे ३० एप्रिलपासून रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही कमी झाला आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसारण्याचे आशादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे.

१८ एप्रिल रोजी ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण होते. ३० एप्रिलपर्यंत त्यामध्ये १२ हजार ४३३ रूग्णांची घट झाली.  तर १ मी रोजी ४३ हजार २४४ सक्रिय रुग्ण होते. त्यामध्ये ०९ मेपर्यंत ९ हजार ५१२ रूग्णांची घट झाली. 

तारीख। पॉझिटिव्ह। सक्रिय रुग्ण 

३० एप्रिल। ४,११९। ४४,२०३०१ मे। ४०६९ ।  ४३२४४०२ मे। ४०४४। ४०, ९०७०३ मे। २५७९। ४२,२२९०४ मे। २८७९। ४०,७९१०५ मे। ३२६०। ३९,८३९०६ मे। २९०२। ३९,७३२०७ मे। २४५१। ३८,४८१०८ मे। २८३७। ३६,५८६०९ मे। २०२५। ३३,७३२

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसGovernmentसरकारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड