शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेत पुणे शहर पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:24 IST

स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरामध्ये महापालिकेची आरोग्य

पुणे : स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरामध्ये महापालिकेची आरोग्य सेवा नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार व आरोग्यविषयक मानांकानुसार पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या, रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा होणार पुरवठा, डॉक्टर व रुग्णसंवाद आदी सर्वंच गोष्टींमध्ये महापालिकेच्या आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे.शहरात सध्या आरोग्याच्या उपलब्ध असलेल्या सुविधाबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेला प्रश्न विचारले होते. यावर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून आरोग्य सेवांचे वास्तव समोर आले आहे. शहरामध्ये सध्या महापालिकेच्या मालकीचे एकूण ४७ बाह्यरुग्ण व दवाखाने व दोन मोठी हॉस्पिटल्स आहेत. याशिवाय १७ प्रसुतीगृहांमधून शहरातील सर्वसामान्य पुणेकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आरोग्य विषयक राष्ट्रीय मानांकानुसार ‘नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार’ पुणे शहरात सरकारी, खासगी रुग्णालये मिळून १७ हजार ५०० बेड्स उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु सध्या पुणे शहरामध्ये महापालिकेच्या सर्व रुग्णालये, प्रसुतिगृहे मिळून केवळ १ हजार १४६ बेड्स आहेत. तर शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या १४ हजार ७२३ इतकी आहे. यामुळे नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार सध्या शहरामध्ये तब्बल १ हजार ६३१ बेड्सची आवश्यकता आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण २१६ पदे मंजूर आहेत. परंतु, यापैकी सध्या १७७ डॉक्टरांची पदे भरलेली असून, ३९ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. याशिवाय नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य कर्मचारी अशी एकूण तब्बल ५०० पेक्षा अधिक पदे आरोग्य विभागात रिक्त असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांची संख्याच कमी असल्याने अनेक ठिकाणी प्रामुख्याने प्रसुतीगृहांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांना डॉक्टर नसल्याने ससून अथवा अन्य खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. उपलब्ध असलेले डॉक्टर कधीही वेळेवर हजर राहात नाहीत, अनेक महत्त्वाच्या औषधांचा साठा उपलब्ध नसतो, डॉक्टर, नर्स रुग्णालयात येणाºया पेशंटसोबत योग्य संवाद करत नाहीत, रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. रुग्णालय व परिसरात प्रचंड अस्वच्छता आदी सर्वच गोष्टींमुळे स्मार्ट, मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पुणे शहरातील आरोग्याच्या सुविधांबाबत नॅशनल हेल्थ पॉलिसीनुसार खूपच पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेने शहराचास्वतंत्र हेल्थ प्लॅन करावास्मार्ट सिटीच्या गोष्टी करणाºया पुणे महापालिकेला सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्याचे थोडेही गांभीर्य नाही. आरोग्य प्रमुखासह डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, ही खेदाची बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तातडीने ही सर्व पदे भरली पाहिजेत. रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या वाढली पाहिजे. तसेच शहराच्या विकास आराखड्याप्रमाणेच आता पुणेकरांना चांगल्या, दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शहराचा स्वतंत्र हेल्थ प्लॅन तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.-विशाल तांबे,नगरसेवक, महापालिका