शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : अध्यासनप्रमुखांच्या निवडीला अखेर सुरुवात, बंद कार्यालयांचे उघडणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:53 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकूण १९ अध्यासने आहेत, त्यापैकी १७ अध्यासनांची प्रमुखपदे रिक्त होती. ही बंद अध्यासने सुरू व्हावीत, यासाठी ‘लोकमत’कडून पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अखेर प्रमुखांच्या निवडीला सुरुवात झाल्याने त्यांचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अध्यासनप्रमुखांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. के. एच. संचेती, प्रा. सुहास पळशीकर, प्रा. राजा दीक्षित यांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. तीन अध्यासनांच्या प्रमुखांची नावे अंतिम झाली आहेत. संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुखपदी सदानंद मोरे, संत तुकाराम अध्यासनाच्या प्रमुखपदी अभय टिळक, पद्मश्री विखे-पाटील अध्यासनाच्या प्रमुखपदी डॉ. मुकुंद तापकीर यांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अध्यासनांवर प्रमुख म्हणून काम करण्यासाठी काही जणांनी स्वत:हून अर्ज केले होते. शोध समितीने काही तज्ज्ञांशी संपर्क साधून या अध्यासनांवर काम करण्याविषयी विचारणा केली आहे. त्यानुसार अध्यासनांवरील प्रमुखांची नावे अंतिम केली जात आहेत. यामुळे अध्यासनांचे बंद असलेले काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाकडून महापुरुष, समाजसुधारक, कलावंत यांच्या नावाने अध्यासने सुरू करण्यात आली. अध्यासनांच्या माध्यमातून त्यांचे विचार व कार्यांवर संशोधन व्हावे, तसेच सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी विषयांवर अध्यासनांनी चर्चा घडवून आणावी, असा यामागचा हेतू आहे; मात्र तीन वर्षांपासून अध्यासनप्रमुखांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व छत्रपती शिवाजी अध्यासन वगळता १७ अध्यासनांची प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यामुळे या अध्यासनांचे सर्व कामकाजच थंडावले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठElectionनिवडणूक