शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : काळा बाजार करणा-या ११२ दुकानांचे परवाने रद्द, हजारो टनचा धान्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:32 IST

रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ्याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत.

विशाल शिर्के पुणे : रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ्याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. यातील १२ परवाने गेल्या वर्षभरात रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत हजारोटन धान्यसाठा आणि सुमारे १३ हजार लिटर केरोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.शिधापत्रिकाधारकांना २ रुपये किलो दराने गहू, ३ रुपये किलो तांदूळ आणि केरोसिन १५.४५ रुपये लिटर दराने मिळते. सध्या शहरातील केरोसिनचा कोटा पूर्ण रद्द केला आहे. एफडीओच्या भरारी पथकाने दुकानांची अचानक तपासणी केल्यावर मिळालेले आणि शिधापत्रिकाधारकांना वितरीत केलेले धान्य याचा मेळ काही लागत नाही. त्यावरुन संबंधित दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केल्याचे निष्पन्न होते. अनेकदा पोलिसांच्या कारवाईतही काळाबाजार करणारे समोर येतात. त्या नुसार एफडीओ कार्यालयाकडून परवाना रद्दची अथवा दंडात्मक कारवाई केली जाते.गेल्या सात वर्षांत अशा जवळपास अडीचशे रेशनिंग दुकानांवर कारवाई झाली असून, त्यातील ११२ दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही माहिती उघड केली आहे.कारवाईतही तफावतपरिमंडळ ड मधील काकासाहेब महादेवराव कांबळे यांच्या दुकानात २५६ किलो गहू अणि ७.५३ किलो तांदळाची तफावत आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र, गजानन डी बाबर या ज परिमंडळातील परवानाधारकाकडे ३०० किलो तांदळाची तफावत आढळूनही त्यांना केवळ ९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अ परिमंडळातील बी. डी. औसरमल या परवानाधारकाने २२ क्विंटल गहू आणि १९ क्विंटल तांदळाची तफावत आढळली असून, त्यांना १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, त्यांचा परवाना रद्द झाल्याची नोंद कागदपत्रात आढळून येत नाही.

टॅग्स :Puneपुणे