शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांना ‘आयएसबीएन’ क्रमांक मिळण्याप्रकरणी लक्ष घालावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुस्तक विक्री व्यवसाय हा अनंत अडचणींमधून जात आहे. त्यात पुस्तकांसाठी आवश्यक असणारा इंटरनॅशनल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या पुस्तक विक्री व्यवसाय हा अनंत अडचणींमधून जात आहे. त्यात पुस्तकांसाठी आवश्यक असणारा इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर (आयएसबीएन) प्रकाशकांना मिळू शकत नसल्याने पुस्तक निर्मितीवर परिणाम होत आहे. पुस्तक नोंदणीसाठीचे जुने आणि नवीन पोर्टल काम करीत नसल्याने प्रकाशकांना आयएसबीएन क्रमांक मिळणे अवघड झाले आहे. तरी या प्रकरणात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशा आशयाचे पत्र मराठी प्रकाशक परिषदेने केंद्राच्या राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सीच्या संचालकांना पाठविले आहे.

‘पुस्तके अडकली आयएसबीएन च्या चक्रात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये (दि.१६) प्रकाशकांना ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर’ हा केंद्राच्या राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सीच्या किचकट प्रक्रियेमुळे मिळणे अवघड झाले आहे, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. लॉकडाऊनच्या काळात नूतनीकरणामुळे हे संकेतस्थळ काही महिने बंद होते आणि आता जरी ते पूर्ववत सुरू केले असले, तरी ही प्रक्रिया पूर्ण करूनही आयएसबीएन क्रमांक मिळत नसल्यामुळे पुस्तके छापू शकत नाहीत याकडे प्रकाशकांनी लक्ष वेधले आहे.

नवीन पुस्तकांसाठी आयएसबीएन क्रमांक मिळू शकत नसल्याबददल प्रकाशकांच्या अनेक तक्रारी संस्थेकडे प्राप्त झाल्या आहेत. एजन्सीच्या नवीन पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील व्हेरिफिकेशनसाठी कोणताही मेल प्रकाशकांना पाठविला जात नाही. तरी राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सीने लक्ष घालून ही प्रक्रिया सुरळित सुरू करण्याची मागणी मराठी प्रकाशक परिषदेने केली आहे.