शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पु. ल. देशपांडे, नारायण सुर्वे, विंदा करंदीकरांना ऐका!

By admin | Updated: January 7, 2016 01:41 IST

आपल्या अक्षर साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे, कवी नारायण सुर्वे, ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर, नाटककार प्रा. वसंत कानेटकर,

पुणे : आपल्या अक्षर साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे, कवी नारायण सुर्वे, ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर, नाटककार प्रा. वसंत कानेटकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवयित्री शांता शेळके, रामदास फुटाणे अशी अनेक मोठी नावे आहेत. या सर्वांनीच साहित्य संमेलनाची व्यासपीठे त्यांच्या अजोड विचारांनी गाजविली आहेत. त्यांच्या तेव्हाच्या आवाजातील अत्यंत दुर्मिळ ध्वनिफितींचे प्रक्षेपण पुणे आकाशवाणीसह राज्यातील सर्व २० उपकेंद्रांमध्ये सात जानेवारीपासून मराठी साहित्यप्रेमी रसिकांसाठी प्रक्षेपित केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची ही एक नांदीच असेल, असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले. आकाशवाणीकडील दिग्गज साहित्यिकांच्या आवाजातील हा दुर्मिळ ठेवा ८९ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व २० उपकेंद्रांवर ऐकवला जाईल. या भरगच्च कार्यक्रमास सात जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत म्हणजे संमेलन संपेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत ते पोहोचवण्यात येणार आहे, असे नगरकर म्हणाले.