शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:33 IST

फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. 

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक आज पुणे येथील कौन्सिल हॉल सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीसाठी डॉ. प्रदीप व्यास-प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. दीपक म्हैसेकर-विभागीय आयुक्त पुणे, राजीव जाधव-कामगार आयुक्त, शेखर गायकवाड-साखर आयुक्त, डॉ. अर्चना पाटील-संचालक आरोग्य सेवा, डॉ. अशोक थोरात-जिल्हा शल्यचिकित्सक बीड, डॉ.अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी आदी अधिकारी उपस्थित होते.ना. डॉ. गोऱ्हे यांनी सविस्तर सूचना देताना राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी व ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे. आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश ना. डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान  पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या  परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशाही सूचना ना. डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.ऊसतोड कामगार महिलामध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. या बाबत चिंता व्यक्त  करून  महिला कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे व आवश्यक  सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व हे सर्वेक्षण 30 जुलै 2019 पूर्वी अहवाल सादर करावा, अशा सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.प्रधान सचिव डॉ.  प्रदीप व्यास यांनी ऊसतोड कामगार यांना आवश्यक आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच फिरते रुग्णालय उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले. कामगार आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी कामगार विभाग निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. शेखर गायकवाड साखर आयुक्त यांनी याबाबत सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे