शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांची कपात ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:52 IST

प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे.

पुणे : प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रशासनाच्या पाठीशी थांबले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांनी मात्र यावर रान उठवले आहे. सर्वसाधारण सभेत शुक्रवारी या विषयावरून त्यांनी गोंधळ घातला.महापालिकेने कंत्राटी स्वरूपात ठेकेदार कंपन्यांकडून तब्बल १ हजार ७०० सुरक्षारक्षक घेतले आहेत. त्यांतील अनेक जण राजकीय वरदहस्त असलेले होते. अनेक जण कामावर उपस्थित नसत. काही ठिकाणी गरज नसताना जास्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. प्रशासनाने त्यावर बोट ठेवून तब्बल ९०० सुरक्षारक्षकांची कपात केली; मात्र त्यामुळे नगरसेवक संतापले. दोन महिन्यांपासून हा विषय महापालिकेत गाजत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे व साईनाथ बाबर हे सभागृहात सुरक्षारक्षकांचा गणवेश घालून आले होते. मोरे यांनी प्रशासनावर टीका केली. काही जण कामचुकार असतील, कामावर जात नसतील हे खरेही असेल; मात्र त्यांनाच कमी करण्याऐवजी सरसकट ९०० जणांना बेरोजगार करीत असल्यावर त्यांनी आक्षेप घेतले. इतकी वर्षे चालत होते; मग आताच त्यांची गरज कमी का झाली, असा प्रश्न त्यांनी विचारला.माजी उपमहापौर दीपक मानकर, वसंत मोरे, सुनीता वाडेकर आदींनी या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. कायम शिपायांच्या ६०० पेक्षा जास्त जागा रिक्त असताना त्या भरल्या का जात नाहीत, अशी विचारणा मानकर यांनी केली. गफूर पठाण, अविनाश बागवे सुरक्षारक्षकांच्या निविदेबाबत काही बोलण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र त्यांना महापौर मुक्ता टिळक यांनी थांबवले. त्यावरून बराच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मध्यस्थी करून सदस्यांना बोलू द्यावे, असे सांगितले. प्रकाश कदम यांनी वापरलेल्या एका शब्दावरून पुन्हा वाद झाला. मोरे व धीरज घाटे यांनी तो शब्द कामकाजातून काढण्यास सांगितले.