शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

आयुक्तांच्या प्रस्तावांना ठेंगाच

By admin | Updated: July 13, 2016 00:56 IST

प्रशासन व स्थायी समिती सदस्य यांच्यातील समझोता बैठकीनंतरही स्थायी समितीने आयुक्तांनी दिलेला ३५० कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव पुन्हा एक आठवड्यासाठी पुढे ढकलला

पुणे : प्रशासन व स्थायी समिती सदस्य यांच्यातील समझोता बैठकीनंतरही स्थायी समितीने आयुक्तांनी दिलेला ३५० कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव पुन्हा एक आठवड्यासाठी पुढे ढकलला. शहरातील विविध विकासकामांसाठी म्हणून आयुक्तांनी ही रक्कम नगरसेवकांच्या निधीमधून वर्ग करून मागितली होती. त्याला काँग्रेस, मनसे तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहयोगी सदस्य अश्विनी कदम यांनीही विरोध कायम ठेवला.आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातून तत्कालीन स्थायी समितीने बरीच मोठी कपात केली होती. त्यामुळे आयुक्तांनी नव्या स्थायी समितीसमोर शहरातील सुमारे ५१ विकासकामांसाठी तब्बल ३५० कोटी रुपये अंदाजपत्रकातून वर्ग करून मागितले आहेत. त्यांनी दिलेल्या या वर्गीकरणाच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या मागील बैठकीत वादळी चर्चा झाली. काँग्रेस, मनसे यांनी तर या प्रस्तावाला विरोध केलाच, शिवाय स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनीही विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला हा प्रस्ताव मंजूर व्हायला हवा होता. एकमत होत नसल्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयावर पुन्हा चर्चा झाली. आयुक्त कुणाल कुमार हे या वेळी उपस्थित होते. त्यांनी पुन्हा एकदा शहरात सुरू असलेल्या विविध कामांची गती कमी व्हायची नसेल तर निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. सदस्यांच्या मागणीनुसार त्यांनी ३५० कोटी रुपयांचे कामनिहाय विवरणही समितीला सादर केले. मात्र, याही वेळी काँग्रेस, मनसे व कदम यांनी विरोध कायम ठेवला. कदम यांच्यासह अन्य काही सदस्यांनी या विषयाला उपसूचना दिल्या.(प्रतिनिधी)