शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुण्यातही उभारणार व्यापार-उद्योग केंद्र, पीएमआरडीचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:35 IST

शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या २० एकर जागेवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यापार-उद्योग संकुल उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला आहे.

- अभिजित कोळपे

पुणे : शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या २० एकर जागेवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यापार-उद्योग संकुल उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला आहे. मेट्रो स्टेशन आणि व्यापार-उद्योग संकुल म्हणून ही जागा वापरल्यास दरमहा नियमित लाखो रुपयांचा महसूल राज्य शासनाला मिळू शकतो, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.राज्यावरील कर्जाच्या बोजामुळे विकासकामांसाठी निधी नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाच्या मालकीच्या जमिनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसित केल्यास मोठी मदत होऊ शकते. पुणे शहराच्या मध्यभागी आणि आजूबाजूला अशाबऱ्याच जमिनी आहेत. त्याविकसित करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएच्या धर्तीवर पीएमआरडीएने पुण्यातील मोक्याची आणि चांगला व्यावसायिक वापर होऊ शकेल अशा काही जागांची पाहणी केली आहे.यामध्ये शिवाजीनगरमधील २० एकरावर उभी असलेली शासकीय तंत्रशिक्षण विभागाची जागा योग्य आहे. या संदर्भात प्राथमिक पातळीवर पीएमआरडीएने विभागीय कार्यालयाबरोबर चर्चा केली असून, तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.हजारो विद्यार्थ्यांवर प्रस्ताव अन्यायकारकपीएमआरडीएने शासकीय तंत्रशिक्षण विभागाच्या २० एकरांवरील सर्व विभाग हलविण्याचा दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. या निर्णयामुळे येथे प्रथम, द्वितीय व अंशकालीन पदविका अभ्यासक्रमांतील विद्याशाखामध्ये शिक्षण घेणारे असे ३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. या संस्थेची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ अशा सत्रांत सुरू असते. तसेच विद्यार्थी शहराच्या व जिल्ह्यातून येथे रोज ये-जा करत असतात. त्यांना शिवाजीनगर एसटी स्टॅँड आणि पुणे स्टेशनवरून हे अंतर जवळचे आहे. मात्र पीएमआरडीएने दिलेली औंध आयटीआयची जागा या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अपुरी आणि गैरसोयीची आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही, असा अभिप्राय राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालय कार्यालयाला पाठविला आहे, असे तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांनी सांगितले.२० एकर जागेसाठी दोन प्रस्तावव्यापार-उद्योग संकुलासाठी आम्ही दोन प्रस्ताव पाठवले आहेत. पहिला शिवाजीनगरचा शासकीय तंत्रशिक्षण विभाग पूर्णत: औंध आयटीआयमध्ये स्थलांतरित करायचा आणि दुसरा २० एकर जागेतील दहा एकर जागेवर व्यापार-उद्योग संकुल आणि दहा एकर जागेवर शासकीय तंत्रशिक्षण विभाग राहावा, असा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. शासकीय तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांच्याबरोबरही आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत.- किरण गित्ते, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)शैक्षणिक क्षेत्रात ६ दशके नावाजलेली संस्था म्हणून शासकीय तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. मेट्रो स्टेशन आणि बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर या जागेचा व्यापार-उद्योग संकुल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो येथे शिक्षण घेणाºया हजारो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. कारण सादर केलेल्या प्रस्तावामध्ये ही जागा विकसित नियोजन आराखड्यामध्ये (डी.पी.) मेट्रो स्टेशन किंवा व्यापार-उद्योग संकुलासाठी आरक्षित नाही. या जागेच्या प्रस्तावाबाबत पीएमआरडीएला फेरविचार करण्याची विनंती केली आहे.- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेनापीएमआरडीएने प्रस्तावित स्थलांतरणाचे दिलेले ठिकाण म्हणजे औंध आयटीआयमध्ये उपलब्ध १२.६५ हेक्टर जागेवर एकूण ३५३६९ चौ.मी. बांधकाम आहे. तसेच तेथे आणखी काही नवीन इमारतींचे बांधकाम प्रस्तावित असल्याचे दिसते. त्या संस्थेच्या जागेतून हायटेन्शन पॉवरलाइन जात असून, सध्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी खेळाच्या मैदानाकरिता मोकळी जागा नसल्याचे दिसून येते. औंध आयटीआय ही राज्याच्या कौशल्य विकास विभागांतर्गत येते, तर शासकीय तंत्रशिक्षण संस्था ही राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांर्तगत येत आहे. हेही कळविले आहे. - डॉ. दिलीप नंदनवार, सहसंचालकशासकीय तंत्रशिक्षण विभागातील सद्य:स्थितीक्र. सर्व्हे नंबर जागेचे क्षेत्रफळ बांधकाम क्षेत्रफळ इमारती व त्यामध्ये सुरू असलेल्या (चौ. मीटरमध्ये) (चौ. मीटरमध्ये) अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता (विद्यार्थी)०१ १०९ ५३,६०० १२,१६३ ७२० (विद्यार्थी)(भांबुर्डा, शिवाजीनगर) (स्थापत्य, यंत्र, विद्युत व धातुशास्त्र)०२ ४३१-१, २ व ३ २०,३५५ ६,९७७ १२० (विद्यार्थी)(भांबुर्डा, शिवाजीनगर) प्रवेशक्षमतेचे दोन मुलांचे वसतिगृह०३ ४३२-१ व २ १०,७१४ ४,७१० ३०० (विद्यार्थी)(भांबुर्डा, शिवाजीनगर) (माहिती तंत्रज्ञान व संगणक अभियांत्रिकी पूर्ण वेळ व अंशकालीन पदविका)एकूण क्षेत्रफळ व विद्यार्थी संख्या ८४,६६९ २३,८५१ १०२० (अभ्यासक्रम) व २४० (वसतिगृह)

टॅग्स :Puneपुणे