शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार करा फक्त उपनगरांत

By admin | Updated: January 28, 2017 01:59 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्या २९४ जागांची यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर केली.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्या २९४ जागांची यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र, या यादीमध्ये आंबेगाव, कोंढवा, वडगावशेरी, बावधन, पाषाण या उपनगरांमधीलच जागांचा प्रामुख्याने समावेश असून, मध्यवस्तीमधील एकाही जागेचा समावेश नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी चौकांमध्ये कॉर्नर सभा घेण्याशिवाय उमेदवारांकडे पर्याय उपलब्ध नसेल.प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना प्रचारसभांसाठी जागेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शाळा प्रशासनाकडून प्रचारसभांसाठी जागा दिल्या जात नाहीत. चौकांमध्ये सभा घेतल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मोजक्या जागा मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा लागते. त्यातून वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, पालिका प्रशासनाकडून प्रचारसभांसाठी पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांची यादी जाहीर केली आहे. पालिकेला अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून मिळालेल्या मोकळ्या जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.शहरातील अनेक प्रभागांमध्ये चौकाचौकांत कॉर्नर सभा घेण्याशिवाय उमेदवारांकडे आता पर्याय नाही. चौकांमध्ये प्रचारसभा घ्यायची असल्यास त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सभांसाठी जागा मिळविण्याकरिता उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)