शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:26 IST

महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे

पुणे : महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोळा होणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिकची समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.शहरामध्ये दररोज तब्बल १६०० ते १७०० टन कचरा गोळा होतो. यात प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. यामध्ये दररोज तब्बल १० टनांपेक्षा अधिक प्लॅस्टिक बाटल्या वापरून फेकल्या जातात. या बाटल्यांमुळे प्लॅस्टिकच्या समस्येत भर पडत आहे. त्याचबरोबर अशा बाटल्यांमध्ये नियमित पाणी भरून पॅकिंग करून त्या विकल्या जातात, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. त्यावर उपाययोजना म्हणून आर्टस अलाईव्ह फाउंडेशन या संस्थेने प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराचा प्रकल्प हाती घेतला आहे. सद्यस्थितीला कोरेगाव पार्क आणि औंध या ठिकाणी दररोज १० हजार बाटल्यांची प्रकिया केली जात आहे. आता संपूर्ण शहरात ५० ठिकाणी बाटल्या गोळा करण्यासाठी यंत्रणा राबविली आहे. त्यानुसार प्रामुख्याने बाजार पेठा, रेल्वे स्टेशन, संस्था तसेच धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी संकलित होणाºया बाटल्या गोळा करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.