पुणो : गणोशविसजर्न मिरवणूक निघणा:या लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक, शास्त्री या रस्त्यांसह त्यांना जोडणा:या उपरस्त्यांच्या 1क्क् मीटर परिसरात पार्किगला बंदी करण्यात आली आहे. या आदेशामधून पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि एमएसईबीच्या वाहनांना वगळण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
शहरातील शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, संपूर्ण लक्ष्मी रस्ता, संपूर्ण टिळक रस्ता, सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौकादरम्यान वाहतूक बंद राहील. यासोबतच बाजीराव रस्त्यावरील सारसबागेपासून फुटक्या बुरुजार्पयत, गणोश रस्त्यावरील दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रस्त्यावरील बुधवार चौक ते टिळक चौक, गुरू नानक रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौकादरम्यानही बंदी करण्यात आली आहे.
तसेच कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्यरुसन रस्ता आणि भांडारकर रस्ताही आवश्यकतेप्रमाणो दुपारी चारनंतर मिरवणूक संपेर्पयत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे आवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
1 गणोशोत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग ठेवण्यात आले आहेत. या आपत्कालीन मार्गावर नागरिकांनी वाहने उभी करू नयेत, असे आवाहन आवाड यांनी केले आहे.
2 पेरुगेट परिसर ते भिकारदास चौकी ते महाराणा प्रताप उद्यानाच्या पाठीमागून रघुवीर जादूगार निवासस्थानापासून भावे चौक, विश्व हॉटेल, ना. सी. फडके चौक मार्गे हा पहिला मार्ग ठेवण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ता व केळकर रस्त्यासाठी पत्र्या मारुती चौकापासून टकले हवली ते बालगंधर्व रंगमंदिर किंवा जयंतराव टिळक पूल मार्ग हा दुसरा मार्ग आपत्कालीन मार्ग म्हणून ठेवण्यात आला आहे.
3 बाजीराव आणि शिवाजी रस्त्यांवर आपत्कालीन परीस्थिती उद्भवल्यास
चिंचेची तालीम ते शिवाजी मराठा हायस्कूल
ते सुभाषनगर ते राष्ट्रभूषण चौकापासून
सिंहगड गॅरेजमार्गे नागरिक इच्छित स्थळी जाऊ शकतात. रविवार पेठेतील सुभानशहा दर्गा,
गोविंद हलवाई चौकामार्गेही नागरिक
सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात. डेक्कन परिसरातील नागरिकांना नळस्टॉप, म्हात्रे पूल, सेनादत्त पोलीस चौक, स्वारगेट मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
नागरिकांसाठी
एकेरी पादचारी मार्ग
च्गणोशविसजर्न मिरवणूक पाहण्यासाठी येणा:या नागरिकांना मिरवणूक पाहणो सोयीचे व्हावे, याकरिता एकेरी पादचारी मार्ग करण्यात आले आहेत.
च्शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील गाडगीळ पुतळ्यापासून जिजामाता चौक, गणोश रस्त्याने फडके चौकाकडून उजवीकडे वळून मोती चौकातून सरळ सोन्या मारुती चौकात यावे. येथून उजवीकडे वळून सरळ बेलबाग चौक ते सेवासदन चौकातून सरळ लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे फक्त जाण्यासाठी मार्ग नेमण्यात आला आहे. टिळक चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी केली.
च्अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापासून मोती चौकाकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मंडईतील रामेश्वर चौकाकडून शनिपारकडे जाण्यासाठी, टिळक रस्ता, बाजीराव, कुमठेकर, केळकर या रस्त्यांवर दुहेरी पादचारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. विसजर्न मिरवणूक सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाल्यापासून संपेर्पयत हा बदल लागू राहील.