शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांना घ्यावे लागणार अध्यापनाचे धडे; तंत्रशिक्षणचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:44 IST

अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे

ठळक मुद्देप्राध्यापक होण्यासाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन घातले जाणार आहे.संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी याचा फायदा होईल.

पुणे : अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राध्यापक होण्यासाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन घातले जाणार आहे. चालु शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरूवात केली जाणार आहे.तंत्रशिक्षण परिषदेकडून महाविद्यालये, संस्थांमधील प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकासह पुढील पदांवर रूजु होणार्‍या अनेक प्राध्यापकांना अध्यापनाचे फारसे ज्ञान नसते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, समन्वय राखणे, आवश्यक सामान्य ज्ञान हेही अनेकांना तितकेसे अवगत नसते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अध्यापनाचा दर्जा खालवण्याबरोबरच पदविका, पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होता. या बाबींचा विचार करून परिषदेने त्यासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षकांना डी. एड., बी. एड. हे अध्यापनाची पदवी किंवा पदविका असणे बंधनकारक असते. अध्यापनासह आवश्यक बाबींचे शिक्षण यामध्ये दिले जाते. त्यानुसार तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीही सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, नव्याने प्राध्यापक म्हणून येणारे आणि सध्या प्राध्यापक असलेल्या सर्वांसाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणे प्रत्येकासाठी बंधनकारक असेल. दोन-दोन महिन्यांचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. नवीन प्राध्यापकांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय रूजू होता येणार नाही. तर जुन्यांना चार-पाच वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी याचा फायदा होईल. त्यानुसार त्याची रचना करण्यात आली आहे. ‘फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम’ या नावाचा हा अभ्यासक्रम असून चालु शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, असे सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :educationशैक्षणिकProfessorप्राध्यापक