शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांना मिळणार संप काळातील वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:33 IST

राज्यातील प्राध्यापक ४ फेब्रुवारी ते १० मे २०१३ या कालावधीत ७१ दिवस संपावर गेले होते. या संपकाळातील वेतन शासनाने रोखले होते.

पुणे : राज्यातील १२,५१५ प्राध्यापकांना ७१ दिवसांच्या संपकाळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर प्राध्यापकांना थकीत वेतनाची रक्कम मिळणार आहे. मात्र, प्राध्यापकांना संपकाळातील वेतनाची खिरापत देऊ नये. तसेच नियमित प्राध्यापकांप्रमाणे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांनाही त्यांची शिष्यवृत्ती वेळेत द्यावी, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांनी दिल्या आहेत.राज्यातील प्राध्यापक ४ फेब्रुवारी ते १० मे २०१३ या कालावधीत ७१ दिवस संपावर गेले होते. या संपकाळातील वेतन शासनाने रोखले होते. त्यावर प्राध्यापक संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. त्यास राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथेही प्राध्यापकांच्याच बाजूने निकाल लागला. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर प्राध्यापकांना थकीत वेतनाची रक्कम मिळणार आहे. परंतु,राज्य शासनावर त्यामुळे ९१९ कोटी ८१ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. दरम्यान, राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भातही शासन निर्णय येत्या चार दिवसात प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. 

शासनाने अधिकार नसताना २०१३चे प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे वेतन रोखले होते. त्यावर उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय दिला. खरे तर २ मार्च २०२० रोजी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.- प्रा.एस.पी. लवांडे, एम.फुक्टो, सचिवशासनाने एकाच घटकाला आर्थिक लाभ देऊ नये. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसह शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनाही वेळेत शिष्यवृत्ती द्यावी.- स्वप्नील बेगडे, प्रदेश मंत्री, अभाविप 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcollegeमहाविद्यालय