शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी, नेहरुनगर, मासूळकर कॉलनीत उत्साहात जुलूस

By admin | Updated: December 25, 2015 01:37 IST

हजरत महंमद पैगंबर जयंती व ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुस्लीम बांधवांनी नेहरुनगर, विठ्ठलनगर, बालाजीनगर, मासूळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडी, लांडेवाडी, भोसरी परिसरातून जुलूस काढला.

नेहरुनगर : हजरत महंमद पैगंबर जयंती व ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुस्लीम बांधवांनी नेहरुनगर, विठ्ठलनगर, बालाजीनगर, मासूळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडी, लांडेवाडी, भोसरी परिसरातून जुलूस काढला.नेहरुनगर येथील तवकल्ला जामा मशिदीच्या व बज्मे फजले रसूल यांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसेन या चौकातून जुलूस काढण्यात आला. जुलूसमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. या मिरवणुकीत विविध घोषणा देण्यात आल्या. नागरिकांनी जुलूस पाहण्यासाठी नेहरू चौकात गर्दी केली होती. याचबरोबर मशिदीमध्ये लहान मुलांनी धार्मिक प्रवचन सादर केले. या मुलांना बज्मे फजले रसूल यांच्या वतीने मुलांना नवीन पोशाख व खाऊवाटप झाले. मशिदीमध्ये मौलाना अब्दुल कलाम यांनी ईद-ए-मिलादचे महत्त्व सांगून नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली.डॉ. जाकीर हुसेन चौकातील कार्यक्रमाला नगरसेवक राहुल भोसले, तवकल्ला जामा मशिदीचे अध्यक्ष नजीर तराजगार, मजीद दळवी, हाजी रशीद पीरजादे, शफिक शेख, बरकत शेख, कादर नाईक, दस्तगीर तराजगार उपस्थित होते. मुनाफ तराजगार, इरफान देशनुर, अयातुल्ला सय्यद, जावेद पठाण, रज्जाक तराजगार, सलीम शेख, शाहिद सिद्दिकी, फयाज तराजगार, न्याजू शिखलकर, शकील शेख आदींनी आयोजन केले होते. विठ्ठलनगर येथील यंग बॉईज जुलूस कमिटीच्या वतीने जुलूस काढण्यात आला होता. काबा शरीफची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. सहभागी अनेक मुस्लीम बांधवांनी ‘बारवीह का चाँद आया... सोना आया...’ या गीतांवर आनंदोत्सव साजरा केला. आयोजन ए. बी. शेख, संस्थापक जाकीर शेख, अध्यक्ष शाहरुख पठाण, आसिफ इनामदार, सद्दाम शेख आदींनी केले.बज्मे पंजेतनने धार्मिक प्रश्नावर स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांक इर्शाद शेख, द्वितीय मुस्कान इनामदार आणि तृतीय क्रमांक मुस्कान सय्यद यांनी मिळविला. नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका शकुंतला बनसोडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जमील औटी, मेहबूब शेख, मुबीन शेख, आसिफ मुलानी, मुस्लीम शहा,अलफरहान शहा उपस्थित होते. यानंतर जुलूस काढण्यात आला.नेहरुनगर जुलुस कमिटीच्या वतीने संतोषी माता चौकात स्वागतकमान उभारण्यात आली होती. सरबतचे वाटप करून ईद-ए- मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आयोजन शहाबुद्दीन सय्यद हाजी मजर बादशाहा, अली शेख, मेहमूद शेख, गुलजार शेख यांनी केले होते.मोरवाडी येथील मदरशा या गरीब नवाज मस्जिदच्या वतीनेदेखील जुलुस काढण्यात आला. जुलुस मोरवाडी अजमेरा परिसरातून काढण्यात आला. आयोजन युसूफ पठाण, अन्वर पठाण, इलाही शेख, नाजिर शेख, रशिद सय्यद, याकूब सय्यद यांनी केले होते.लांडेवाडी येथील दारूल उलूम अशरफीयाच्या वतीने मदीना मस्जिदची प्रतिकृती तयार केली होती. भोसरी येथील अंजुमने सैफुल इस्लाम मस्जिदच्या वतीने जुलुस काढण्यात आला होता. सर्व जुलुस नेहरुनगर, मासूळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडीमार्गे काढण्यात आले. जुलुस पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)