शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:47 IST

राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा रोजगार मेळावा होणार

पुणे: कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यामुळे या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली. राज्यात उद्योगांना चांगले वातावरण असून मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार झाले आहेत.राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ होत आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने पुण्यात आयोजित केल्या जाणा-या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.देसाई म्हणाले,उद्योगांसाठी लागणा-या जमीन,पाणी,वीज आदी पायाभूत सुविधेसह राज्यात कुशल मन्युष्यबळ उपलब्ध आहे.त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणा-या उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यातच काही कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेवून ठेवले होते. मात्र, त्यावर कोणताही औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेले राज्यातील सुमारे २ हजार भूखंड शासनाने पुन्हा ताब्यात घेतले असून त्याची फेर वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. तळेगाव एमआयडीसीमधील जमीन सुध्दा विविध कंपन्यांना दिली जात आहे.राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,उद्योग संचलनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून त्यासाठी ८ हजार ८०० बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४ हजार ८०० बेरोजगार तांत्रिक क्षेत्रातील आहेत.परिसरातील ९२ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश बापट व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. तसेच पुण्यानंतर नाशिक व नवी मुंबईसह राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत,असेही देसाई म्हणाले.दरम्यान, भोसरी येथील एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारले असता हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नसल्याने देसाई यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेSubhash Desaiसुभाष देसाईnanar refinery projectनाणार प्रकल्पMIDCएमआयडीसी