शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी पाण्यावाचून लोकांचे हाल

By admin | Updated: May 25, 2016 04:40 IST

तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकर, एक पिकअप

भोर : तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकर, एक पिकअप जीप मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही ठिकाणी दोन-तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, काही ठिकाणी विजेअभावी आठवडाभरापासून टँकर बंद आहे. नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्यावाचून लोकांचे हाल सुरू आहेत.भाटघर व नीरा-देवघर धरण भागातील व महुडे व वीसगाव खोऱ्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. १४ गावे २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे २ महिन्यांपूर्वीच सादर केले होते. ३ गावांचे व १० वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सुमारे ३,५७८ लोकांसाठी माणशी २० लिटरप्रमाणे पाणीवाटप करण्यासाठी २ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सदर टँकरने त्यातील महुडे बुद्रुक गावातील दलितवस्ती, मातंगवस्ती, आखाडेवस्ती, भानुसदरा, हुंबेवस्ती, गोरेवस्ती यांना १२ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरने दररोज ३ खेपा, तर पसुरेची धनगरवस्ती, तळजाईनगर, भुतोंडे, डेरे, गृहिणी, गुढेचे निवंगण, कळंबाचा माळ या गावांना व वाड्यावस्त्यांना १० हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरने दररोज ३ खेपा करायच्या आहेत. २० एप्रिल रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर दुर्गाडी मानटवस्ती, रायरी धारांबेवाडी, अशिंपीची उंबार्डेवाडी, शिळींबची राजिवडी, शिरगाव पातरटकेवाडी, डेहेणची जळकेवाडी, सोनरवाडी, हुंबेवस्ती यांना २ टँकर मंजूर झाले असून, ४ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन-तीन दिवसांतून टँकर जात आहे. तर, वीज नसल्याने कोंडगाव जळकेवाडी, सोनारवाडी, हुंबेवस्ती यांना ८ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे पाण्यावाचून नागरिकांसह जनावरांचे मोठे हाल होत आहेत. भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण भागातील हिर्डोशीची सोमजाईवस्ती, हरळीचा माळ, कोंडगाव चौधरीवस्ती, धानवली महादेववाडी, वरेवाडी, मिरकुटवाडी, कुडली बुद्रुक, साळुंगण, वारवंड या गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. तर बालवडी, कुडली कुर्द, वरोडी डायमुख, धनावडेवाडी, शेरताटी वरोडी बुद्रुक, ससेवाडी, माझेरी, कुरुंजी, वाढाणे या गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नेरे, कोंडगाव हे प्रस्ताव परिपूर्ण आहेत. दुर्गाडी, वारवंड, शिरवली, हि. माची, चौधरीवस्ती अशा एकूण १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत. यात नीरादेवघर धरण भागातील १२ वाड्या, भाटघर धरणभागातील २ गावे १० वाड्या तर वीसगाव खोऱ्यातील ४ गावे २ वाड्यावस्त्या, महुडे खोऱ्यातील ४ वाड्या तर महामार्गावरील एका गावाचा समावेश असून अजून टँकर मागणाऱ्या गावांची वाढ होऊ शकते.टँकरचा ठेका सोनाई दूधवाहतूक संस्था इंदापूरला मिळाला आहे. मात्र, त्यांच्याकडून भोर तालुक्यातील ३ गावे १६ वाड्यावस्त्यांवरील ३,५५७ लोकांसाठी माणशी २० लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करायचा असून त्यासाठी १० हजार व १२ हजार लिटरचे दोन टँकरने पाणीपुरवठा करणार आहेत. मात्र, संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टँकर निम्माच भरून जात आहे. भुतोंडे येथे दोन दिवसांपासून टँकर बंद आहे. तर, जळकेवाडी सोनारवाडी, हुंबेवस्ती आणि कोंडगाव येथे वीजपुरवठा खंडित असल्याने आठ दिवसापांसून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्यावाचून हाल होत असल्याचे भगवान कंक यांनी सांगितले. (वार्ताहर)