शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नवे स्थानक अडचणीचे?, वाहतूक कोंडीत भर पडण्याचीच शक्यता, व्यावसायिकांवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:27 IST

छत्रपती शिवाजीमहाराज या मुख्य चौकातील एसटी स्थानक मागील पाच वर्षांपूर्वी मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या कारवाईत पाडण्यात आले.

कामशेत : येथील छत्रपती शिवाजीमहाराज या मुख्य चौकातील एसटी स्थानक मागील पाच वर्षांपूर्वी मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या कारवाईत पाडण्यात आले. याच ठिकाणी आता आमदारांच्या पुढाकाराने पुन्हा स्थानकाचे काम सुरू झाले आहे. या नवीन स्थानकामुळे चौकातील वाहतूककोंडीत मोठी भर पडणार असून, पुन्हा एकदा गरीब टपरीधारकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे.जुने स्थानक सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले. किरकोळ व्यावसायिक, टपरीधारक यांचीही दुकाने पाडण्यात आली. तेव्हापासून येथे एसटी प्रवासी उघड्यावरच थांबत असून, पाच वर्षांनंतर शासनाला जाग आली आहे. आमदार निधीतून या स्थानकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू झाले आहे.स्थानकाअभावी प्रवाशांना इतरत्र दुकानांच्या आडोशाला उभे राहावे लागते. वाहतूककोंडी होणार नाही व गरीब व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, अशा प्रकारे स्थानक उभारावे, अशी मागणी होती.मागील अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर या गरिब व्यावसायिकांना हातगाडीवर व्यवसाय सुरू करावा लागला. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्या व्यवसायावर गदा येणार असल्याने सर्व ते चिंताग्रस्त आहेत. चौकात फडकणारा भगवा ध्वज काढण्यात येणार असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. त्यामुळेच रविवार, दि. २४ रोजी सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी, तरुण व टपरीधारक, व्यावसायिक यांची सकाळी दहा वा. बैठक होणार आहे.शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून चौकात मोठे एसटी स्थानक बांधून वाहतूककोंडीत भरच पडणार असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. चौकात एसटी बसला वळण घेणेही अवघड असताना हे स्थानक झाल्यास याचा नक्की कोणाला फायदा होणार आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी स्थानकाविषयी ग्रामपंचायतीकडे कोणतीच माहिती नाही. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या नव्या स्थानकात नक्की कोणाचे भले होणार आहे, असा प्रश्न काही नागरिक विचारत आहेत.काही महिन्यांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून एसटी स्थानके उभारण्यात आली. येथेही स्थानक उभारण्याचा मानस होता. पण, पीडब्ल्यूडी व ग्रामपंचायतीने वाहतूककोंडी व व्यावसायिकांना त्रास होण्याच्या कारणावरून परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी पवनानगर चौकात स्थानक उभारले. गरिबांच्या पोटावर पाय, तसेच भगवा ध्वज काढून देणार नाही, अशी मागणी डॉ. विकेश मुथा, नीलेश दाभाडे, संजय पडवकर, मनोज धावडे, परेश बरदाडे, योगेश घारे, सचिन येवले, अश्विन दाभाडे व टपरीधारकांनी केली आहे.काम थांबविण्याची मागणीसुरू असलेल्या एसटी स्थानकाचे काम हे चुकीचे आहे. येथे रहदारी व गरिबांच्या व्यवसायाला त्रास होऊ शकत असल्याचे कारण देऊन या स्थानकाचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी शिवसेना कामशेत शहर प्रमुख गणेश भोकरे व शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.>शिवसेनेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मावळातील अनेक भागांमध्ये बस थांबे उभारण्यात आले. कामशेत येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात बस थांबा उभारण्याचा मानस होता. पण, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, वाहतूककोंडी व टपरीधारक आदी कारणे देण्यात आली. या चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांचा भगवा ध्वज काढू नये. तसे झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. - राजेश खांडभोर, शिवसेना तालुकाप्रमुखजुने बस स्थानक कारवाईत पाडले. त्या वेळी ते अनधिकृत होते असे सांगण्यात आले. आता नव्याने स्थानकाचे काम सुरू आहे, हे अधिकृत कसे काय? सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोके ठिकाणावर नाही. राजकारणी मंडळी फक्त स्वार्थासाठी समाजोपयोगी कामे करीत असून, त्यांना स्थानिक समस्यांमध्ये बिल्कूल रस नाही.- सचिन शेडगे, अध्यक्ष,सह्याद्री प्रतिष्ठान>रविवारी छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील बस स्थानकाबाबत सर्वांची बैठक बोलावली असून, त्या वेळी विचारविनिमय होईल. यावर सर्वांच्या सोईने व सहकार्याने तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे. मात्र, चौकातील भगवा ध्वज हलवण्यात येणार नाही, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही या पद्धतीने स्थानक उभे करावे, अशी मागणी आहे.- मनोज धावडे,सामाजिक कार्यकर्ते