शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभुत्व नसल्याने मराठी भाषेची अडचण

By admin | Updated: January 14, 2017 03:12 IST

‘‘मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषेविषयी निश्चित असे धोरण नाही. तसेच इंग्रजी भाषेचा बाऊ केला व मराठीविषयी न्यूनगंड बाळगला

सासवड : ‘‘मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषेविषयी निश्चित असे धोरण नाही. तसेच इंग्रजी भाषेचा बाऊ केला व मराठीविषयी न्यूनगंड बाळगला; त्यामुळे ती विकसित होऊ शकली नाही. मातृभाषेपेक्षा इतर भाषांना अधिक महत्त्व दिल्याने मराठीवरील प्रभुत्व कमी झाले आणि त्यामुळेच आपल्याच भाषेची अडचण कामकाजात जाणवत आहे,’’ अशी खंत प्रा. अरुण कोळेकर यांनी व्यक्त केली.सासवड (ता. पुरंदर) येथील सासवड न्यायालय आणि सासवड बार संघटना यांच्या वतीने न्यायालयीन कामकाजात ‘मराठी भाषेचा वापर’ याविषयी चर्चासत्र आयोजित कारण्यात आले होते, त्या वेळी प्रा. कोळेकर यांनी मराठी भाषेविषयी आपले विचार स्पष्ट केले. सासवड न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या प्रसंगी सहन्यायाधीश ए. आर. दिंडे, न्या. व्ही. बी. साळुंखे, बारचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश बारटक्के, उपाध्यक्ष विशाल पोमण, तसेच बारचे पदाधिकारी व ज्येष्ठ आणि इतर वकील मंडळी उपस्थित होती. कोळेकर म्हणाले, ‘‘मराठी भाषेची अवस्था डोक्यावर सुवर्णमुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे, अशी झाली आहे. तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केवळ न्यायसंस्थेने आदेश देण्याची गरज नाही, तर प्रत्येकाने तिचा जीवनात वापर करणे अनिवार्य आहे भाषेची रचना असते. साहित्य, शास्त्रीय, कथा-कादंबरी या क्षेत्रातील भाषा वेगवेगळी असते ती समजून घेणे गरजेचे आहे. त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. पुस्तके, ग्रंथ आदी विकत घेऊन त्यांचे दैनंदिन वाचन केले पाहिजे. केवळ भाषणे ठोकून किंवा कायदे करून मराठी भाषा विकसित होणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ती आत्मसात केली पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. कोळेकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)