शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 2:21 AM

नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहेत.

- सचिन कांकरिया नारायणगाव : नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहे़ या बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते़ येथील बसस्थानकात येणारा प्रवासी बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहून बसस्थानकात न थांबता बाहेर थांबणेच पसंत करीत आहे़पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव एसटी बसस्थानक हे प्रमुख व महत्वाचा थांबा समजला जातो़ नाशिक ते पुणे दरम्यान संगमनेरनंतर नारायणगाव हेच बसस्थानक अनेक बसेससाठी थांबा आहे़हे बस स्थानक सन १९४१-४२ मध्ये सुरू झालेले हे बसस्थानक ब्रिटिशकालिन बसस्थानक आहे. आज या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे़या बसस्थानकामध्ये विविध राज्यातील एसटी बस या ठिकाणी येतात. यामध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमधील बसेस या ठिकाणी येतात़ तर बसस्थानकामध्ये दररोज ३५० बस ये-जा करतात़ जुन्नर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यातील अर्धा भाग नारायणगाव आगाराशी जोडला गेलेला आहे़ आंबेगाव तालुक्यात २२६ बसेस या ठिकाणाहून ये-जा करतात़पुणे-नाशिककडे जाणाºया विनावाहक, निमआराम बसेस तसेच शिवनेरी या वातानुकूलित बसदेखील या ठिकाणी ये-जा करतात़ त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची २४ तास वर्दळ असते़नारायणगाव हे आगार असताना देखील येथील बसस्थानक जीर्ण अवस्थेत होऊनदेखील कोणीही याबाबत दखल घेत नाही़ या बसस्थानकातील पुढील भाग खाजगी व्यक्तींनी फलक तयार केल्याने चांगला वाटतो़ परंतु आतमध्ये गेल्यानंतर प्रवासी या ठिकाणी बसण्यासदेखील तयार होत नाहीत़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती आहे़रंगकाम कधी केले होते का? हे सांगणे अवघड आहे़ छतास अनेक भागांत पाझर येऊन गळती सुरू झाली आहे़ पावसाळ्यात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळत असते़बसस्थानकामध्ये बाहेरगावाहून आलेल्या चालक-वाहकांसाठी बसण्याची किंवा राहण्याची योग्य अशी व्यवस्था नाही़ प्रवाशी बसस्थानकामध्ये वाहने लावून बाहेर निघून जातात. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही़नारायणगाव बसस्थानक अद्ययावत होणार की नाही? असा प्रश्न सर्वच प्रवाशांना पडत आहे. जर जीर्ण झालेले बसस्थानक लवकरात लवकर नव्याने बांधले गेले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते़एस़ टी़ बसचे आॅफीस, कंट्रोल रूम याची दुरवस्था झालेली आहे. कॉलम बिमला तडे जाण्यास सुरूवात झालेली आहे़ ठिकठिकाणी कचरा पडून अस्वच्छता निर्माण झालेली आहे़प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही़ शौचालयालगत सर्व भाग दुर्गंधी युक्त झाला आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ . एस़टी ़स्टॅन्डच्या मागील बाजूस दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आहेत़ तर रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी आढळून येतात़या एस ़टी स्थानकात मुंबई, पुणे, नगर, ठाणे, औरंगाबाद, बारामती येथील प्रवाशांसह अन्य भागातील प्रवाशी याठिकाणी येतात़ या प्रवाशांना बस स्थानकाची दुरवस्था व अस्वच्छता पाहील्यानंतर नारायणगाव हे मोठे शहर असूनही जीर्ण असे बस स्थानक पाहून आश्चर्य व्यक्त करतात़नारायणगाव बसस्थानक हे जुने बसस्थानक आहे़ राज्य परिवहन विभागाचे विभागीय अभियंता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी बसस्थानकाचा सर्वे करून मोजणी केलेली आहे़ पुन्हा एकदा मुख्य मोजणी होणार आहे. मात्र अद्याप झालेली नाही. नव्याने प्लॅन तयार करून नवीन बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़- महेश विटे, वाहतूक नियंत्रक, नारायणगाव बसस्थानक