शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणाचा तेलुगुवर एकतर्फी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:09 IST

मध्यंतराला हरियाणा संघाने २८-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. तेव्हाच त्यांचा विजय स्पष्ट झाला होता.

पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करणाऱ्या हरियाणा संघाने तेलुगु संघाचा ४६-२५ असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळविला.मध्यंतराला हरियाणा संघाने २८-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. तेव्हाच त्यांचा विजय स्पष्ट झाला होता.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणाने येथील अगोदरच्या सामन्यात पाटणा पायरेट्स या बलाढ्य संघावर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना आजही त्याच कामगिरीची अपेक्षा होती अर्थात तेलुगु संघानेही या अगोदरच्या सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाला दोन गुणांनी हरविले होते. त्यांनाही आजचा सामना जिंकण्याची आशा होती.हरियाणा संघाने सुरुवातीपासूनच जोरदार व पल्लेदार चढाया तसेच उत्कृष्ट पकडी याच्या जोरावर प्रतिस्पर्धी तेलुगू टायटन्स संघाला फारशी संधी दिली नाही. त्यांनी सुरुवातीपासून खेळावर वर्चस्व मिळविले होते ते त्यांनी मध्यंतरापर्यंत ठेवले होते. त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी साखळी पद्धतीने प्रतिस्पर्धी चढाईपटूला आपल्या जाळ्यात कसे ओढता येईल याचे बरोबर नियोजन केले होते आणि या नियोजनामध्ये तेलुगु संघाचे चढाईपटू बरोबर सापडले. तसेच हरियाणा संघाच्या विनय, राहुल, शिवम पठारे, मोहम्मद रेझा शादलुई या चढाई पटूंनी खोलवर चढाया करीत गुणांची वसुली केली. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढविला. त्यानंतर बराच वेळ तेलुगु संघाला गुण नोंदविण्यात यश मिळाले नाही मध्यंतरास तीन मिनिटे बाकी असताना त्यांना आणखी एक लोण स्वीकारावा लागला. मध्यंतरापर्यंत तरी तेलुगु संघाला दोन्ही आघाड्यांवर फारसा सूर गवसला नाही.उत्तरार्धात तेलुगु संघाच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र हरियाणा संघाच्या नियोजनबद्ध खेळामुळे त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.‌ शेवटची दहा मिनिटे बाकी असताना हरियाणा संघ ३४-१६ असा आघाडीवर होता.  शेवटची पाच मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने ४०-१७ अशी मोठी आघाडी मिळवली होती. हरियाणा संघाकडून शिवम पठारे याने बारा गुण तर विनयने सात गुण नोंदविले. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल याने तेरा गुणांची नोंद केली.