हडपसर : रामटेकडी येथील पंपिंंग स्टेशनवर टॅँकर भरण्याबरोबर दुचाकी, चारचाकी वाहने धुतली जातात. त्याचबरोबर स्थानिक लोक दमदाटी करून येथे कपडेही धुतात. यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर रोज पाण्याची डबकी साचलेली दिसतात.रामटेकडी येथे पंपिंंग स्टेशन आहे. या ठिकाणहून दररोज टॅँकर भरून जातात. भेकराईनगर, पॉवरहाऊस, उरुळीदेवाची या ठिकाणी या टॅँकरमधून पाणीपुरवठा होतो. एका वेळी तीन टॅँकर येथे भरले जातात. टॅँॅकर भरण्यासाठी रांगा लागत असतात; मात्र त्या मध्येच वाहने घुसवून ती धुतली जातात. त्याचप्रमाणे रिक्षा, टेम्पोमध्ये कॅनने पाणी भरून नेणारी मंडळीही मोठ्या प्रमाणावर येथे येतात. यामुळे टॅँकर भरण्यास अडथळा होत असतो. टॅँकर चालकांवर अरेरावी करत येथील स्थानिक लोक मनमानी करताना दिसतात. यामध्ये लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत जाते.अनेक दिवसांपासून असलेल्या या पंपिंंग स्टेशनचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. या स्टेशनला कुंपण नाही, त्यामुळे सुरक्षितता नाही. पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याचा वापर करण्यासाठी जे प्रबोधन पालिका करते, तसेच काही प्रमाणात सुधारणा व आधुनिकीकरण झाले, तर पाण्याची बचत होईल. (वार्ताहर)
पंपिंग स्टेशनवर धुतली जातात खासगी वाहने
By admin | Updated: July 10, 2015 02:08 IST