शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खासगी वाहतूक शुक्रवारपासून महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 07:13 IST

सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे पुढील काळात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्कूल बससह खासगी कंपन्यांना सेवा देणाऱ्या बस

पुणे : सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे पुढील काळात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्कूल बससह खासगी कंपन्यांना सेवा देणाऱ्या बस, टेम्पो, ट्रकच्या भाडेदरात १५ ते २५ टक्के वाढ करण्याच्या निर्णय संघटनांनी घेतला असून येत्या शुक्रवारपासून (दि. १) ही भाडेवाढ लागू होणार आहे. ट्रक, टेम्पोचे भाडे वाढणार असल्याने भाजीपाला, तसेच इतर वस्तूंची महागाई वाढण्याची शक्यता आहे.मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बस, टेम्पो, ट्रक वाहतूकदारांनी काही काळ झळ सोसून आता भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वाहतूक भाडेदरात शुक्रवारपासून २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. दि पूना बस ओनर्स असोसिएशननेही दि. १ जूनपासून बस भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. टेम्पो पंचायतीकडून डिझेल दरवाढीवर चिंता व्यक्त केली आहे.एसटीने भाडेवाढ करावीखासगी लक्झरी बसचे भाडे एसटी महामंडळाच्या बसभाड्याशी संलग्न आहे. त्यामुळे एसटी भाड्याच्या दीडपटीपेक्षा आम्ही भाडे आकारू शकत नाही. सध्याचे भाडे परवडणारे असले, तरी सातत्याने डिझेल दरवाढ होत असल्याने नफा कमी झाला आहे. ही दरवाढ सुरूच राहिल्यास तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे एसटीने वेळीच तिकीट दरात वाढ करावी. जेणेकरून खासगी बसचे भाडेही त्या प्रमाणात वाढेल.- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष,पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनविद्यार्थ्यांचा खर्च वाढलास्कूल बस वाहतुकदारांनी भाडेदरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी वाहतुक महागली आहे. त्यामुळे एकीकडे शाळेचे शुल्कवाढ आणि आता वाहतुक भाडेही वाढल्याने पालकांचा खिसा रिकामा होणार आहे.पुणे बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जुनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूल बस भाडेवाढीमध्ये डिझेल दरवाढीचा ५० टक्के वाटा आहे. तसेच बदललेल्या बस नियमावलीमुळे बसेसमध्ये विविध बदल करावे लागत आहेत. चालक, महिला सहायकांचे वेतन वाढले आहे.