पुणे : माध्यमांच्या विस्फोटात आजही आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आणि बातम्यांनाच प्राधान्य दिलं जातं आणि त्यांनाच प्रमाण मानलं जातं. अस्थिर सामाजिक परिस्थितीमध्ये खासगी वाहिन्यांनी उतावळेपणा न करता वार्तांकन करावे, असा सल्ला ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी वाहिन्यांना दिला. आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने राष्ट्रीय लोकप्रसारण दिनानिमित्त ‘आव्हान आणि बलस्थान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. विश्राम ढोले, डॉ. अभय जेरे, रितू छाब्रिया, आकाशवाणीचे सहायक निदेशक रवींद्र खासनीस, आशीष भटनागर उपस्थित होते. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या ‘प्रक्षेपणातून लोकसेवा’ या लघुपटाला पहिले, एमआयटी इंटरनॅशनल कॉलेज आॅफ ब्रॉडकास्टिंग अॅण्ड जर्नालिझमला दुसरे तर स्कूल आॅफ आर्किटेक्ट अॅण्ड डिझाइनला तृतीय पारितोषिक देण्यात आले. (प्रतिनिधी)
खासगी वाहिन्यांनी उतावळेपणा टाळावा
By admin | Updated: November 14, 2016 06:58 IST