शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा खून करणाऱ्या आईला तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 02:30 IST

बॅटने केला होता हल्ला; अनैतिक संबंधांत ठरला होता अडथळा

पुणे : अनैतिक संबंधांत अडथळा ठरतोय म्हणून पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी हा आदेश दिला.राखी तरुण बालपांडे (वय ४१, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने आपला १३ वर्षांचा मुलगा चैतन्य तरुण बालपांडे याला मारहाण केली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राखी ही उच्चशिक्षित असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत होती. राखी आणि तिच्या पतीत वाद होत असल्याने त्यांना घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. राखी बालपांडे ही घटनेच्या दोन वर्षांपासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहत होती. त्या वेळी तिच्या घराचा मालक असलेल्या सुमीत मोरे याच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. अपंग असल्याने चैतन्य कायम घरातच राहायचा, तर राखीच्या घरी सुमीत व त्याच्या दोन मित्राचे येणे-जाणे होते. त्यामुळे तिला चैतन्यची अडचण होऊ लागली होती. त्यातूनच तिने आॅगस्ट २०१३ मध्ये बॅटने मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार दाखल झाली होती. या खटल्यात जिल्हा सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी कामकाज पाहिले. चैतन्य हा केवळ १३ वर्षांचा होता. त्याने पूर्ण जगही पाहिले नाही. आईवर विश्वास असताना तिने अशा प्रकारचे कृत्य केले. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पवार यांनी केला. त्यामुळे राखीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने राखीला खून प्रकरणी दोषी न धरता सदोष मनुष्यवध प्रकरणी शिक्षा सुनावली. तर, तिचा साथीदार सुमीत मोरे याच्याविरुद्ध पुरावे न आढळल्याने त्याची न्यायालयाने मुक्तता केली.राखीने केली होती दया दाखविण्याची मागणीउपचारादरम्यान पडल्याने मार लागून त्याचा मृत्यू झाला, असा बचाव करण्यात आला होता.मात्र, तपासाअंती चैतन्यला बॅटने मारहाण झाल्याचे समोर आहे. याप्रकरणी बचाव पक्षाने महिलेला दया दाखविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती; मात्र तिला शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Murderखून